शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

रशियन, जर्मन, जपानी संस्कृतीचे शिवाजी विद्यापीठात घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:44 AM

रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगाल संस्कृतीचे दर्शन शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित ‘कार्निव्हल’ या कला, सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी घडले. ‘कार्निव्हल’ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली.

ठळक मुद्देरशियन, जर्मन, जपानी संस्कृतीचे शिवाजी विद्यापीठात घडले दर्शनविदेशी भाषा विभागाचा ‘कार्निव्हल’; विद्यार्थ्यांची गर्दी

कोल्हापूर : रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगाल संस्कृतीचे दर्शन शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित ‘कार्निव्हल’ या कला, सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी घडले. ‘कार्निव्हल’ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली.विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये या कार्निव्हलचे उद्घाटन चित्रकार संपत नायकवाडी यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे, स्नेहा वझे, स्नेहल शेटे, शीतल कुलकर्णी, प्रियांका माळकर, ऐश्वर्या चव्हाण, आदी उपस्थित होते.

या उद्घाटनापूर्वी झालेल्या ओरिगामी कार्यशाळेमध्ये चित्रकार अर्चना देसाई यांनी ओरिगामी प्रात्यक्षिके सादर केली. लीलीची फुले, गांधी टोपी, बाऊल, आदी विविध कागदी कलावस्तू बनविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी रशियन, जपानी, जर्मन, पोर्तुगीज संस्कृतीशी संबंधित कलावस्तू, ओरिगामी कार्यशाळेत निर्मिती केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडले. त्यात जपानची बुलेट ट्रेनची प्रतिकृती, जपानी चित्रे, जर्मनीचे बी.एम.डब्ल्यू, फोक्स व्हॅगन कंपन्यांच्या मोटारींची मॉडेल्स, फुटबॉल, हाम्बुर्ग व बर्लिन शहरांची माहिती, पोतुर्गालमधील सिरॅमिक प्लेटस् व पोर्सिलीन वस्तू, की चेन, फ्रीज मॅग्नेट, स्कार्फ, रशियन संस्कृतीतील समवार (चहाची किटली, भांडे), मत्र्योशका (लाकडी बाहुली), ग्झहेल सिरॅमिक (लाकडी वस्तू), इकोम (फोटो फे्रम), जुनी नाणी, सणांची माहिती देणारे जुने कॅलेंडर, त्सार टोपी, रशियन रंगचित्रे, साकुरा फुले आणि माउंट फुजीची कलाकृती, शिबोरी प्रकारातील विविध पर्यावरणस्नेही वस्तू, आदींचा समावेश होता.

‘ओरिगामी’तून तयार केलेल्या कागदी फुले, फ्रेम लावलेल्या आणि शिन्चेन व जपानी छत्री-पंखा असलेल्या ‘सेल्फी पाँईट’वर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सेल्फी टिपून घेतल्या. सायंकाळी ‘वजदा’ हा अरेबिक चित्रपट दाखविण्यात आला.

संस्कृतींना जोडणारा दुवाविदेशी भाषा, कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारा हा उत्सव विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. त्यातून दूरदेशीच्या कलानिर्मिती प्रक्रियेच्या आनंदाची प्रचिती येते, असे नायकवाडी यांनी सांगितले. परदेशी संस्कृतीचा भाग असणाऱ्या या पारंपरिक विविधरंगी कलावस्तू प्रेक्षकांना एक व्यापक व समावेशक दृष्टी देतात. लोकांच्या जीवनात रंग भरतात, असे मत डॉ. मेघा पानसरे यांनी व्यक्त केले.

विविध चार भाषा आणि त्यांच्या प्रांतांच्या संस्कृतीची एकत्रित माहिती या ‘कार्निव्हल’मध्ये मिळाली. त्यामुळे या भाषांबाबत आवड निर्माण झाली. नावीन्यपूर्ण संकल्पना विदेशी भाषा विभागाने राबविली आहे.- कोमल गुंदेशा,विद्यार्थिनी

 

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी