शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासाठी १४३ कोटी मंजूर, भूसंपादनासाठी स्वतंत्र समिती नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:35 IST

मंदिरातील हेमाडपंथी बांधकाम; शिखरांचे जतन होणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्याला मंगळवारी उच्चाधिकार समितीने मान्यता दिली. याअंतर्गत मंदिराच्या मूळ हेमाडपंथी बांधकामाचे, ६४ योगिनींच्या मूर्ती, शिखर अशी मंदिर जतन संवर्धनाची कामे केली जाणार आहे. भूसंपादन कशा पद्धतीने करता येईल हे अभ्यासण्यासाठी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात समिती अहवाल शासनाला सादर केल्यानंतर भूसंपादनावर निर्णय होईल.मंगळवारी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी दूरदृश्याप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत ही मान्यता मिळाली. कोल्हापुरातून जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, नगररचना विभागाचे विनय झगडे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या १४४० कोटींच्या विकास आराखड्याला मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर अंबाबाई आराखड्याचा विषय पुढे गेला नव्हता. मंगळवारी मंत्रालयातून मात्र यावर शिक्कामोर्तब झाल्याने विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पहिला टप्पा ५०० कोटींचामंदिराचा पहिला टप्पा ५०० कोटींचा असून, त्यात मंदिरांतर्गत सुधारणांचीच कामे १४३ कोटींची आहेत. आता भूसंपादन वगळून जतन संवर्धनाच्या कामांना मंजुरी दिली गेली आहे.

पुढे काय?पुरातत्व विभागामार्फत महिन्याभरात पूर्ण मंदिराची मोजमाप करून अंदाजपत्रक तयार केले जाईल. हे अंदाजपत्रक वित्त व नियोजन विभागाकडे जाईल. त्यांच्याकडून निधी वर्ग झाला की कामांना सुरुवात होईल.

हे होणार १४३ कोटींमध्येमंदिराच्या मूळ दगडी वास्तूचे जतन संवर्धन, ६४ योगिनींसह वास्तूवरील सर्व शिल्पांची, शिखराची डागडुजी, गळती काढणे, फरशा, अंतर्गत विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, फरशा, ड्रेनेज सिस्टीम ही मंदिर प्रकारातील जतन संवर्धनाची कामे केली जातील.

भूसंपादन अहवालाकडे लक्ष?मंदिरांतर्गत व बाह्य परिसरात दुकानदार, रहिवासी, कुळ अशा सर्व प्रकारचे मिळकतदार आहेत. या मिळकदारांची संख्या, मिळकतीचे मूल्यांकन, त्यांना टीडीआर, रक्कम किंवा अन्य कोणत्या पद्धतीने नुकसानभरपाई देता येईल, काय अडचणी येतील याचा अभ्यास करून समिती अहवाल शासनाला देणार आहे. त्यावर शासनाचा निर्णय अवलंबून असल्याने या अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.