घरची परिस्थिती हलाखीची; १८ व्या प्रयत्नात सैन्यदलात निवड झाली, कोल्हापुरात जिगरी दोस्तानं खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:30 IST2026-03-11T15:29:25+5:302026-03-11T15:30:25+5:30

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Rohit Raju Jondhale from Kolhapur was selected in the Indian Army and his best friend carried him on his shoulders in a procession | घरची परिस्थिती हलाखीची; १८ व्या प्रयत्नात सैन्यदलात निवड झाली, कोल्हापुरात जिगरी दोस्तानं खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली

घरची परिस्थिती हलाखीची; १८ व्या प्रयत्नात सैन्यदलात निवड झाली, कोल्हापुरात जिगरी दोस्तानं खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली

दुर्वा दळवी

कोल्हापूर: प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा जिवलग मित्र असतो. जो आपल्या पडत्या काळात आणि आनंदाच्या वेळेला नेहमीच मित्राला साथ देतो. असाच एक मित्र कोल्हापूरसह राज्यात नाहीतर देशात चर्चेत आला आहे. भारतीय सैन्यदलात रोहित राजू जोंधळे याची निवड झाल्याची माहिती मिळताच त्याचा जिवलग मित्र संतोष यांने गुलाल उधळून जल्लोष करत खांद्यावर घेऊन सगळीकडे मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एखाद्या स्वप्नाच्या मागे धावताना कितीही अपयश आलं तरी आपण थांबायचं नसतं आणि आपल्या मित्राला त्याच्या पडत्या काळात नेहमीच साथ द्यायची असते. अशीच एक कोल्हापुरात कहाणी घडली. कोल्हापूरच्या कावळा नाका परिसरात राहणाऱ्या रोहित राजू जोंधळे याची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. रोहित यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांचे एक स्वप्न होते. तर रोहित यांचे जीवलग मित्र संतोष माने यांनीही ते स्वप्न पाहिलेले. परंतु परिस्थितीमुळे संतोष यांनी वेगळी वाट निवडली. पण रोहित यांनी सैन्यात भरती व्हावं यासाठी संतोष यांनी नेहमीच सहकार्य केले. 

१७ वेळा पदरी निराशा 

तब्बल १७ वेळा भरतीसाठी रोहित यांनी प्रयत्न केले पण दरवेळी निराशाच नशिबी आली. आता शेवटची संधी त्यांच्याकडे होती. याचवेळी रोहित यांचे मित्र संतोष यांनी मित्राला सांगितले यावेळी जर तू यशस्वी झालास तर भावा मी खांद्यावर घेऊन तुझी गावभर मिरवणूक काढीन.  आणि मग रोहित यांनी मित्राचा शब्द खरा ठरवला. संतोष यांना रोहित सैन्यात भरती झाल्याची माहिती मिळताच त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करत खांद्यावर घेऊन सगळीकडे मिरवणूक काढली. या दोघांची मैत्री आणि देशभक्ती संगम पहायला मिळाला. 

नेटकऱ्यांना भावली मैत्री

रोहित जोंधळे सैन्यात भरती झाल्याची माहिती मिळताच जीवलग मित्र संतोष यांनी रोहितला खांद्यावर घेत मिरवणूक काढली. 'भारत माता की जय च्या जयघोषात त्यांनी काढलेली ही मिरवणूक नेटकऱ्यांना खूपच भावली. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची चर्चा ही होत आहे. रोहित आणि संतोष यांनी मात्र आपली मैत्री आणि देशभक्ती या व्हिडिओच्या माध्यमातून देशभर पोहोचवली. इतकेच नाही. तर सोबत हा संदेश देखील दिला. जर एखादं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटी तुमच्याजवळ असेल. तर ते स्वप्न एक ना एक दिवस रोहित यांच्यासारखे पूर्ण होतेच होते. 

निवडीच्या दिवशीच रोहितची आई होती आयसीयूमध्ये 

ज्या दिवशी त्याची निवड झाली त्यादिवशी त्याची आई आयसीयूमध्ये होती. एका बाजूला दुख: आणि दुसऱ्या बाजूला आनंद होता. अशा परिस्थितीत रोहितने खूप संघर्ष अनुभवला आहे. आम्हा दोघांचे भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र काही कारणास्तव मी वेगळा मार्ग निवडला. मात्र माझ्या मित्राने भरती होवून ते पुर्ण केल्याने मला आनंद असल्याचे रोहित यांचे मित्र संतोष माने याने सांगितले.

Web Title : 18 प्रयासों के बाद सेना में चयन, दोस्त ने कंधे पर उठाकर मनाया जश्न।

Web Summary : 17 बार अस्वीकार होने के बाद, रोहित जोंधले के सेना में चयन पर कोल्हापुर में उसके दोस्त संतोष ने खुशी से जुलूस निकाला। संतोष ने रोहित को कंधे पर उठाकर उसकी दृढ़ता और उपलब्धि का जश्न मनाया।

Web Title : Kolhapur friend celebrates army selection after 18 attempts with parade.

Web Summary : After 17 rejections, Rohit Jondhale's army selection sparked a jubilant parade by his friend Santosh in Kolhapur. Overjoyed Santosh carried Rohit on his shoulders, celebrating his friend's perseverance and achievement.