शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराकडून जबरी चोरी, घरफोडी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : आर. के. नगर येथे माळावर उभे असलेल्या तरुणास लुटल्याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारास शुक्रवारी रात्री अटक केली. सचिन ...

कोल्हापूर : आर. के. नगर येथे माळावर उभे असलेल्या तरुणास लुटल्याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगारास शुक्रवारी रात्री अटक केली. सचिन दत्तात्रय गवळी (३३ रा. सुभाषनगर, राजारामपुरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून

बाबा जरगनगरातील सुमारे अडीच लाख रुपयांची घरफोडी उघडकीस आली. या दोन्हीही गुन्ह्यातील सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई करत गुन्हे उघडकीस आणले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ११ मे रोजी शुभम बापूसाहेब चव्हाण (रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) हे आर. के. नगर येथे थांबले असताना अनोळखी दोघांनी दुचाकीवरून येऊन त्यांना मारहाणीचा धाक दाखवून त्यांची मोपेड व आयफोन जबरदस्तीने चोरून नेला. त्यांनी राजारामपुरी पोलिसात चोरीची तक्रार दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुन्हेगारांची शोध मोहीम राबविताना शुक्रवारी रात्री केआयटी कॉलेज मार्गावर सचिन गवळी याला दुचाकीसह पकडले. त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने साथीदार विशाल शेरखाने (३७ रा. सुभाषनगर) याच्या मदतीने जबरी चोरीची कबुली दिली. गवळी याच्या ताब्यातून चोरलेली मोपेड व आय फोन असा चोरीचा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित शेरखाने याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, संशयित गवळी याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने दि. ११ मे रोजी रात्रीच बाबा जरगनगरात विजय तुकाराम नार्वेकर (रा. मूळ गाव शेळप, पोस्ट गवसे, ता. आजरा) यांच्या घरी घरफोडी केल्याचीही कबुली दिली. घरफोडीतील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे चोरलेले सोन्याचे दागिनेही त्याच्याकडून जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहा. पो. नि. सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस कर्मचारी सुरेश पाटील, असिफ कलायगार, विनोद कांबये, अनिल जाधव यांनी केली.

दुचाकीवर ‘प्रेस’ लिहून चोऱ्या

आर. के. नगरात तरुणाला लुटताना चोरट्याच्या दुचाकीवर ‘प्रेस’ हे लिहिल्याचे त्या तरुणाने पाहिले होते. पोलिसांनी शोध मोहीम राबविताना सुभाषनगरात सराईत गुन्हेगार गवळी हा दुचाकीवर प्रेस लिहून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडले. तर त्याने साथीदाराच्या मदतीने मंगळवारी (दि. ११) रात्री जबरी चोरी व घरफोडी असे दोन्हीही गुन्हे केल्याचे उघडकीस आले.

फोटो नं. १५०५२०२१-कोल-चोरी०१

ओळ : सराईत घरफोड्यास कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्ह्यातील दोन दुचाकींसह मुद्देमाल जप्त केला.

===Photopath===

150521\15kol_2_15052021_5.jpg

===Caption===

ओळ : सराईत घरफोड्यास कोल्हापूरात स्थानिक गुन्हे अन्वषेण पथकाने शुक्रवारी रात्री अटक केली, त्याच्याकडून दोन गुन्ह्यातील दोन दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला.