शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

corona virus Kolhapur-लॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:21 IST

CoronVairus Kolhapur-जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे कोल्हापूरचे रस्ते ओसगतवर्षीच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर- जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून नागरिकांचे जगणे हैराण करून सोडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा आता दीडशे-दोनशे रोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने सर्वांचीच आता पाचावर धारण बसली आहे. नागरिक भयग्रस्त, चिंताग्रस्त आहेत. जिल्हा व आरोग्य यंत्रणाही कोरोनाची साथ रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु नागरिकांचे म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने राज्य सरकारनेच ‘विकेंड लॉकडाऊन’ जाहीर केला आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झाली.

शुक्रवारी दिवसभराची वाढलेली वर्दळ रात्री आठनंतर कमी व्हायला लागली. पोलीस आणि महानगरपालिकेची पथके रस्त्यावर उतरली तशी शहरातील दुकाने पटापट बंद व्हायला लागली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप चालक यांनी आपले व्यवसाय बंद केले. रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील सर्व रस्ते रिकामे झाले. निर्मनुष्य झाले.

शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, स्टेशनरोड, ताराबाई पार्क, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, पार्वती चित्रमंदिर, उमा टॉकीज आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गतवर्षी पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली होती. प्रसंगी काठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे शुक्रवारी लॉकडाऊनची भीती कोल्हापूरकरांच्या मनात असल्याचे दिसून आले. रस्त्यावर फारसे पोलीस दिसले नाहीत. बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथे मोजकेच पोलीस दिसले. शहरातील अन्य चौकात मात्र पोलिसांविनाच ओस पडले होते.

गतवर्षीच्या आठवणींना उजाळा -

गतवर्षी २२ मार्च रोजी अचानक लॉकडाऊन पुकारला गेला. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. यावेळी मात्र पूर्वनियोजित लॉकडाऊन झाल्यामुळे नागरिकांची तशी गैरसोय झाली नाही. आवश्यक सामानाची खरेदी करता आली. ओस पडलेले निर्मनुष्य रस्ते, स्मशान शांतता, रस्त्यावर भटक्या श्वानांची वर्दळ यामुळे गतवर्षीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमवारी सकाळी सात वाजता हा विकेंड लॉकडाऊन संपणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर