बेळगाव येथे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा १४ एप्रिलला रोड शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST2021-04-09T04:27:27+5:302021-04-09T04:27:27+5:30

गेले दोन दिवस मी तिथेच असून, बेळगावच्या परिस्थितीशी परिचित आहे. येत्या १४ तारखेला मी पुन्हा बेळगावला येणार असून, रोड ...

Road show of Chief Minister Yeddyurappa on April 14 in Belgaum | बेळगाव येथे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा १४ एप्रिलला रोड शो

बेळगाव येथे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा १४ एप्रिलला रोड शो

गेले दोन दिवस मी तिथेच असून, बेळगावच्या परिस्थितीशी परिचित आहे. येत्या १४ तारखेला मी पुन्हा बेळगावला येणार असून, रोड शो करणार आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले. भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्यासाठी दोन दिवस प्रचार केल्यानंतर बेंगलोरला परत चाललेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्याप्रकारे सुरेश अंगडी ४ लाख मतांनी विजयी झाले होते, त्याचप्रकारे त्यांच्या पत्नी मंगला अंगडीदेखील विजयी होतील. १४ एप्रिलला मी पुन्हा बेळगावात येणार आहे. पुन्हा प्रचार करणार आहे आणि बेळगावात रोड शो देखील करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जनता आमच्या पाठीशी आहे आणि मी केलेल्या चांगल्या कार्याला ती पाठिंबा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Road show of Chief Minister Yeddyurappa on April 14 in Belgaum