शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारीत ०१) लाईव्ह व्हिडिओ करत आजऱ्यातील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST

कोल्हापूर : मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ करुन एका विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल ...

कोल्हापूर : मोबाईलवर लाईव्ह व्हिडिओ करुन एका विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आर. के. नगरातील हरी पार्क, पोस्टल कॉलनीत बुधवारी मध्यरात्री घडली. धनश्री आप्पा जाधव (वय २५, सध्या रा. आर. के. नगर, कोल्हापूर. मूळ गाव एरंडोळ, ता. आजरा) असे मृत महिलेचे नाव आहे. उदय पालकर (रा. आर. के. नगर) या घरमालकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धनश्री जाधव यांचा विवाह झाला होता, त्यांना एक मुलगाही आहे, तो आई-वडिलांकडे असतो. त्या पतीपासून विभक्त राहत होत्या. पुण्यात दोन वर्षे खासगी नोकरी करून त्या गेली वर्षभर कोल्हापुरात आर. के. नगरातील पालकर यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या. एका बँकेच्या क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम त्या करत होत्या. त्यांची कोल्हापुरात एकासोबत मैत्री जमली होती. बुधवारी रात्री त्यांनी मित्राशी संवाद साधला, त्यानंतर विवाहितेने गळफास लावून आत्महत्या करत असल्याचे मोबाईलवरून व्हिडिओ पाठविला. त्यावेळी मित्राने धनश्री जाधव राहत असलेले घर गाठले. मित्राने घरमालक पालकर यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी दार ठोठावून धनश्रीला दार उघडण्याबाबत विनंती केली पण प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांनी छताच्या पंख्याला वायरीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

घरमालक पालकर यांनी करवीर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने येऊन पंचनामा केला. खोलीमध्ये मिळालेल्या सुसाईड नोटवर आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर आहे. त्यामुळे त्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज करवीर पोलिसांनी व्यक्त केला.

भविष्यकाळ वाईट आहे...

धनश्री जाधव ह्या माझा भविष्यकाळ वाईट आहे, असे वारंवार मित्रांना सांगत होत्या. स्वभावाने हट्टी होती, असे तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडिओ जप्त

आत्महत्या करत असल्याचा मोबाईलवर व्हिडिओ विवाहितेने तिच्या मित्राला पाठविला होता. तो व्हिडिओ करवीर पोलिसांनी जप्त केला.

(तानाजी)