राष्ट्रवादी ओबीसी सेलचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:29 IST2021-09-15T04:29:19+5:302021-09-15T04:29:19+5:30

काेल्हापूर : शहर राष्ट्रवादी ओबीसी सेलची आढावा बैठक पक्षाच्या शहर कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पाेवार ...

Review of the Nationalist OBC Cell | राष्ट्रवादी ओबीसी सेलचा आढावा

राष्ट्रवादी ओबीसी सेलचा आढावा

काेल्हापूर : शहर राष्ट्रवादी ओबीसी सेलची आढावा बैठक पक्षाच्या शहर कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पाेवार होते. सेलचे अध्यक्ष जहांगीर अत्तार यांनी आढावा घेतला. ओबीसीच्या सवलती बंद करून अन्याय केला असून, यासाठी आंदोलने, निदर्शने व उपोषणसारखे मार्ग अवलंबावे लागतील, त्यासाठी समाजाने सज्ज राहावे, असे आवाहन अत्तार यांनी केले. अनिल खैरमोडे, फारुक अत्तार, अशोक तोरसे यांनी मनोगत केले. अर्जुन पाटील, हिंदूराव खांबे, फैजअहमद बद्री, फिरोज आटपाडे, अक्रम फरास, गफूर शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते. सोहेल बागवान यांनी आभार मानले.

फोटो ओळी : राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत शहराध्यक्ष जहांगीर अत्तार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनिल खैरमोडे, आर. के. पोवार, सुनील देसाई आदी उपस्थित होते. (फोटो-१४०९२०२१-कोल-राष्ट्रवादी)

Web Title: Review of the Nationalist OBC Cell