शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
2
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
6
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
7
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
8
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
9
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
10
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
11
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
12
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
13
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
14
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
15
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
16
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
17
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
18
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
19
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
20
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीचेच रेखांकन कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते ...

कोपार्डे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन बदलून भुये, भुयेवाडी ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला आहे. एकाच रस्त्यासाठी दोन दोन रस्ते प्रस्तावित केल्याने येथील पिकाऊ जमीन व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार आहे. यासाठी सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेले पूर्वीचे रेखांकन कायम करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले आहे की, २०१८ मध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आलेल्या रेखांकनात बदल केल्यामुळे भुये आणि भुयेवाडी ग्रामस्थांची कसदार जमीन, स्थावर मालमत्तेबरोबर नैसर्गिक जलस्रोत असणाऱ्या चार पाच विहिरी कूपनलिका नष्ट होणार आहेत. यामुळे भविष्यात अनेक ग्रामस्थ भूमिहीन होणार आहेत.

गेली दोन वर्षे आम्ही याबाबत लढा देत आहोत. मात्र, याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. उलट छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्वसंमतीने मंजूर रेखांकनाप्रमाणे रस्ता करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

तर निवडणुकांवर बहिष्कार

चौकट : अधिकारी छुप्या पद्धतीने भूसंपादनाचा घाट घालत असून तो त्यांनी वेळीच थांबवावा. अन्यथा गोकुळच्या निवडणुकीत दोन गावच्या दूध संस्थांचे ठरावधारक वेगळा विचार करतील आणि पुढील निवडणुकीवरही बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा देव पाटील यांनी दिला. या निवेदनावर गोकुळचे ठरावधारक शिवाजी महादेव पाटील, अमित शिवकुमार पाटील, अश्विनी विकास पाटील, राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील, राजेंद्र स्वामी, शकुंतला स्वामी, माणिक स्वामी यांच्यासह ४०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

फोटो: ०३ भुयेवाडी निवेदन

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे पूर्वीचे रेखांकन कायम ठेवा, अशी मागणी भुये, भुयेवाडीतील ग्रामस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.