शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण जाहीर; शौमिका महाडिक, इंगवले, अंबरिश यांचे मतदारसंघ आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:47 IST

उमेश आपटे, बजरंग पाटील, शशिकांत खोत, पेरिडकर, हंबीरराव, बोरगे, कोलेकर, रोहिणी आबिटकर, स्वरूपाराणी जाधव, रेश्मा देसाई यांना पुन्हा संधी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाले असून लढाईआधीच अनेकांना शस्त्रे म्यान करावी लागली आहेत. चंदगड आणि भुदरगड तालुक्यांतील प्रत्येकी चारही गटांमध्ये महिलांना संधी मिळाली असून या ठिकाणी एकही जागा सर्वसाधारण राहिली नाही.ताराराणी सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. त्यानुसार सुरुवातीला लोकसंख्येच्या प्रमाणात ९ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये भादोले, आळते, रूकडी, रूई, कबनूर, पट्टणकोडोली, दानोळी, अब्दुललाट, कसबा सांगाव या गटांचा समावेश होता तर यातील पाच सोडतीनुसार महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी नांदणी हा गट निश्चित करण्यात आला.जिल्हा परिषद निवडणूक १९६१ च्या तरतुदीनुसार एकूण जागांच्या २७ टक्के जागा म्हणजे १८ गट सोडतीद्वारे इतर मागासासाठी निश्चित करण्यात आल्या आणि त्यातील ९ महिलांसाठी आरक्षित झाल्या तर उर्वरित सर्वसाधारण ४० पैकी १९ महिलांसाठी आरक्षित झाल्या आणि २१ अनारक्षित राहिल्या.

शौमिका महाडिक, अरूण इंगवले, अंबरिश घाटगे, विजय भोजे, युवराज पाटील, सतीश पाटील, प्रवीण यादव,मनोज फराकटे, पद्माराणी पाटील, मनिषा माने यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत तर माजी अध्यक्ष उमेश आपटे, बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी सभापती सर्जेराव पेरिडकर, हंबीरराव पाटील, विजय बोरगे, हेमंत कोलेकर, रोहिणी आबिटकर, स्वरूपाराणी जाधव, रेश्मा देसाई यांना पुन्हा संधी मिळाली आहे.करवीरमध्ये अटीतटीच्या लढती, तिरंगी लढतीची शक्यताकरवीर तालुक्यातील १२ पैकी ७ गट खुले झाल्याने या तालुक्यात अटीतटीच्या लढती पाहावयास मिळतील. चंद्रदीप नरके, अमल महाडिक आणि सतेज पाटील हे तीन आमदार आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या गटातील लढती लक्षवेधी ठरणार असून भाजप कोणाबरोबर कुठे युती करणार याचीही उत्सुकता आहे. माेठी गावे, गावपातळीवरील तुल्यबळ नेते त्यामुळे ‘करवीर’चे जिल्हा परिषदेचे रणांगण चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत.हातकणंगलेत दिग्गजांना झटका११ पैकी ६ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने आता ताकदीच्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. या तालुक्यांतून याआधी अध्यक्ष झालेल्या शौमिका महाडिक, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, प्रवीण यादव, प्रसाद खोबरे, माजी सभापती वंदना मगदूम, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी सदस्य प्रसाद खोबरे, पुष्पा आळतेकर, विजया पाटील, पद्माराणी पाटील, मनिषा माने यांची संधी हुकली आहे.चंदगडला, भुदरगडला लाडकी बहीण जोरातचंदगड आणि भुदरगडमधील प्रत्येकी चारही गट महिलांसाठी राखीव झाल्याने लाडक्या बहिणी जोरात आहेत. चंदगडमधील कुदनुर आणि अडकूर हे दोन सर्वसाधारण महिलांसाठी तर उर्वरित दोन माणगाव आणि तुडये इतर मागास महिलेसाठी आरक्षित आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भुदरगड तालुक्याकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यांच्या भावजय रोहिणी आबिटकर, बजरंग देसाई यांच्या स्नुषा रेश्मा देसाई आणि दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा स्वरूपाराणी यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची संधी आहे.शाहूवाडीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळणारमाजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, हंबीरराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांना पुन्हा रिंगणात उतरण्याची संधी असून येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगेल असे चित्र आहे.शिरोळमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधीशिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद गट असून, आलास खुला, तर दत्तवाड महिलांसाठी खुला झाल्याने याठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. माजी सभापती स्वाती सासने, शुभांगी शिंदे, माजी सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची संधी हुकली आहे.पन्हाळ्यातील जिल्हा परिषदेचे इच्छुक पंचायत समितीलापन्हाळ्यात सहा जिल्हा परिषद मतदारसंघ असून कोडोली, सातवे आणि पोर्ले तर्फ ठाणे हे मतदारसंघ खुले झाल्याने येथे चुरस बघायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तयारीने काम करत असलेल्या इच्छुकांची आरक्षणानंतर कोंडी झाल्याने कदाचित जिल्हा परिषदेचे इच्छुक पंचायत समितीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे लढतीचे चित्र राहते की त्याला फाटे फुटणार आहे हे लवकरच कळणार आहे.दोन मंत्री, एका आमदारांमुळे आजऱ्यात चुरसपालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मतदारसंघातील आजरा तालुक्यात दोन जागांसाठी संघर्ष उफाळणार आहे. येथील एक मतदारसंघ कमी झाल्याने आधी पदे भूषविलेल्यांना पदे मिळणार की नव्या कार्यकर्त्यांना संधी हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु मतदारसंघच मोठे झाल्याने ‘क्षमता’ असणाऱ्यांचा विचार होईल असे दिसते.राधानगरीत महायुतीमध्ये लढत, काँग्रेसही तुल्यबळराधानगरी तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट असून, राधानगरी व राशिवडे बुद्रुक सर्वसाधारण खुला झाल्याने येथे तुल्यबळ लढती होणार आहेत. या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेना, के. पी., ए.वाय. यांची राष्ट्रवादी आणि तुल्यबळ काँग्रेस यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. गेली पाच वर्षे जिल्हा परिषद निवडणूक लढवायची या तयारीने मतदारसंघ पिंजून काढणारे अभिषेक डोंगळे यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे.गडहिंग्लज तालुक्यात स्थानिक आघाड्यांमध्येच रस्सीखेच‘सर्वसाधारण प्रवर्गा’साठी खुले झालेल्या नेसरी, भडगाव व हलकर्णी मतदारसंघात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच सामना अपेक्षित असला तरी गेल्यावेळीप्रमाणेच सोयीच्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवली जाईल असे सध्याचे चित्र आहे. आरक्षणामुळे माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांची संधी हुकली. मात्र, त्यांच्या पत्नी पुन्हा रिंगणात उतरू शकतात. तर दिग्विजय कुराडे यांना पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे. नेसरीत उमेदवारीसाठी भाजपच्या हेमंत कोलेकर, संग्राम कुपेकर यांच्यात संघर्ष होऊ शकतो.गगनबावड्यात राजकीय समीकरणे बदलणारगगनबावड्यातील आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सतेज पाटील गट आणि पी. जी. शिंदे गटातील जुनी लढत पुन्हा रंगण्याची चिन्हे असून, यावेळी नव्या चेहऱ्यांनाही मैदानात उतरण्याची संधी मिळणार आहे.‘महायुती विरुद्ध महाआघाडी’ अशी लढत होण्याची शक्यता असली तरी, चंद्रदीप नरके गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.कागलमध्ये नेत्यांच्या मुलांसमोर अडचणीकागल तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहाच्या सहा गट राखीव झाल्याने नेत्यांच्या मुलांसमोर अडचणी आल्या निर्माण झाल्या आहेत. एकही सर्वसाधारण खुला प्रवर्गाचा गट नसल्याने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रस्थापित मातब्बरांना धक्का बसला आहे. त्यामुळे यातील काही जण आता पंचायत समितीकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. माजी सभापती युवराज पाटील, अंबरिश घाटगे, इच्छुक वीरेंद्र मंडलिक यांना फटका बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad: Reservation Announced, Key Leaders' Constituencies Reserved

Web Summary : Kolhapur Zilla Parishad's 68 group reservations declared, impacting political heavyweights. Several prominent leaders' constituencies are reserved, altering election dynamics. Women gain significant opportunities in Chandgad and Bhudargad.