शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

कोल्हापूर जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित, किती पदे आरक्षित.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:37 IST

कोल्हापूर : येणाऱ्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले असून, १०२६ पैकी ७२२ पदे आरक्षित असून, ३०४ ...

कोल्हापूर : येणाऱ्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले असून, १०२६ पैकी ७२२ पदे आरक्षित असून, ३०४ सरपंचपदे ही खुली राहणार आहेत. जरी एकूण ६०८ सरपंचपदे खुली राहणार असली तरी त्यातील ३०४ पदे ही महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हे सरपंच पद आरक्षण निश्चित झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले असून, शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुकानिहाय आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतची पत्रव्यवहाराची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच तालुका पातळीवरील सरपंचपद आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी अनुसूचित जातीसाठी १३८ सरपंचपदे आरक्षित राहणार आहेत. यापैकी ६९ पदे अनुसूचितच जातीच्या महिलांसाठी आरक्षित असतील. सात सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहतील. या सातपैकी चार पदे संबंधित संवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७३ पदे आरक्षित राहणार आहेत. त्यापैकी १३७ पदे या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ६०८ पदे जरी खुली असली तरी त्यातील निम्म्या म्हणजे ३०४ पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता प्रत्येक गावातील सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे लक्ष तालुका पातळीवर होणाऱ्या आरक्षणाकडे लागून राहिले आहे. आपल्याला संधी मिळाली नाही तरी पत्नीला किंवा अन्य नातेवाइकांना मिळू शकेल असा आशावाद कार्यकर्ते बाळगून आहेत.

सरपंचपदाचे आरक्षण

  • एकूण ग्रामपंचायती १०२६
  • अनुसूचित जातीसाठी १३८ त्यातील ६९ पदे महिलांसाठी
  • अनुसूचित जमातीसाठी सात सरपंचपदे, त्यातील चार महिलांसाठी
  • नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७३ पदे, त्यातील १३७ महिलांसाठी
  • खुली पदे ६०८, त्यातील ३०४ महिलांसाठी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचreservationआरक्षण