शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 6:03 PM

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे न वगळण्याची विनंतीसह्याद्री व्याघ्र प्रकल्प आज देणार यादी

संदीप आडनाईक सिंधुदुर्ग / कोल्हापूर : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील २७ गावे वगळू नयेत, अशी विनंती करणारे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले असून त्यांच्या आदेशानेच यासंदर्भात आज, मंगळवारी संबंधित गावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ही गावे न वगळण्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी गेल्याच आठवड्यात वनविभागाला पत्र लिहिले होते.''सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्यातील कोअर आणि बफर झोनमधील तसेच तिलारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीवांच्या कॉरिडॉरमध्ये असलेल्या सुमारे २७ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.पश्चिम घाट संवेदशनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी सुमारे २०९२ गावांची अंतिम यादी तयार करण्यात आली. यावर केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांशी गेल्याच आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यात जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला.

नव्या यादीत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व दुर्लक्षित करून नव्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव होता. त्याला खासदार संभाजीराजे छत्रपतींनी तीव्र विरोध करून ती गावे न वगळण्याचे पत्र वनविभागाला दिले. त्यानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाने ही गावे न वगळण्याची लेखी विनंती मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.ही २७ गावे वगळण्याचा आहे घाटसह्याद्री व्याघ्र प्रकल्प : कोल्हापूर : निवळे (कोअर क्षेत्र), उदगिरी (बफर क्षेत्र ता. शाहूवाडी), सांगली : मणदूर (बफर क्षेत्र, ता. शिराळा), व्याघ्र संवर्धन आराखडा : कोल्हापूर : मानोली, धनगरवाडी, येळवण जुगाई (ता. शाहूवाडी), राधानगरी अभयारण्य क्षेत्र आणि राधानगरी अभयारण्य पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र : सावर्डे, रामणवाडी, पाटपन्हाळा आणि पडसाळी (ता. राधानगरी) , वन्यजीव कॉरिडॉर : कोल्हापूर : भोगोली, पिलानी, कानूर खुर्द, (ता. चंदगड), सिंधुदुर्ग : असनिये, बाबळाट, दाभिल, कोणास, देगवे, फणसवडे, केसारी, आंबेगाव, कुणकेरी, माडखोल, पाडवे माजगाव, सारमाले, तांबोळी (ता. सावंतवाडी)मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार आज यादीवगळण्यात येणाऱ्या ३८८ गावांमधील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्य वन्यजीव विभागाला मिळालेले असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील वन्यजीवांसंदर्भातील या गावांची यादी आज, मंगळवारी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून मिळाली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रांत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांतील ५५ गावांचा समावेश होतो. बफर क्षेत्रात याच जिल्ह्यांतील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघ व हत्तींच्या कॉरिडॉरमधील १६ महत्त्वाच्या गावांचा समावेश वगळण्याच्या यादीत आहे. अशा २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशी विनंती वन्यजीव विभागामार्फत राज्य शासनाला केली आहे.- सत्यजित गुजर,क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

टॅग्स :environmentपर्यावरणradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग