सूळ, फडतरे करणार साताऱ्याचे प्रतिनिधीत्व

By Admin | Updated: December 17, 2014 22:56 IST2014-12-17T22:20:16+5:302014-12-17T22:56:02+5:30

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा

Representation of Saturn to the Moles, Stills | सूळ, फडतरे करणार साताऱ्याचे प्रतिनिधीत्व

सूळ, फडतरे करणार साताऱ्याचे प्रतिनिधीत्व

सातारा : अहमदनगर येथील ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी गादी विभागातून राजेंद्र सूळ तर अमोल फडतरे याची माती विभागातून निवड झाली आहे. हे दोघेही ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत साताऱ्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
येथील तालीम संघाच्या मैदानावर दोन दिवस ही निवड चाचणी स्पर्धा सुरू होती. विविध वजनी गटांत राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगिरांची नावे अशी गादी विभाग : ५७ किलो - महेश कुंभार (खटाव), ६१ किलो- नेताजी चव्हाण (कऱ्हाड), ६५ किलो- श्रीधर मुळीक (मुळीकवाडी), ७0 किलो- तानाजी वीरकर (म्हसवड), ७४ किलो- विशाल राजगे (पिंपरी), ८६ किलो- संजय सूळ (सातारा), ९७ किलो- नीलेश लोखंडे.
माती विभाग : ५७ किलो- मल्हारी मदने (कऱ्हाड), ६१ किलो- कांतिलाल माळवे (सातारा), ६५ किलो- सागर नलावडे (ओंड), ७0 किलो - महावीर बनसोडे (माण). ७४ किलो - सागर साळवी (कोपर्डे), अभिजित भोसले (रहिमतपूर), ८६ किलो- जयदीप गायकवाड (फलटण), ९७ किलो - किरण भगत (शिंगणापूर).
स्पर्धेसाठी साहेबराव पवार, साहेबराव जाधव, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, माणिक पवार, मारुती वडार, भीमराव घोरपडे, सुधीर पवार, अमर जाधव, जगन्नाथ झांझुर्णे, दादा ढोले, तानाजी मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, राजेंद्र कणसे, अशोक नलवडे, प्रा. अमोल साठे, सुधीर कदम, जितेंद्र कणसे, जराप्पा लोणार, अमरसिंह देशमुख यांच्या देखरेखीत या स्पर्धा झाल्या.

Web Title: Representation of Saturn to the Moles, Stills