पाईपलाईनबाबत सूचना कळवा
By Admin | Updated: July 9, 2014 00:42 IST2014-07-09T00:42:30+5:302014-07-09T00:42:30+5:30
तोंडी अथवा लेखी सूचना देण्याचे आवाहन

पाईपलाईनबाबत सूचना कळवा
कोल्हापूर : शहरवासीयांचे तीन दशकांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना अधिक सक्षम व पारदर्शकपणे व्हावी यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने योजनेबाबत सूचना घेण्याचे ठरविले आहे. गुरुवारी (दि.१०) तसेच १७ व २४ जुलै या तीन दिवशी नागरिकांनी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागात तोंडी अथवा लेखी सूचना देण्याचे आवाहन जलअभियंता मनिष पवार यांनी पत्रकाद्वारे केले आहे. काळम्मावाडी योजनेची सर्व माहिती महापालिकेने यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये योजनेच्या सर्व तांत्रिक बाबी, नकाशा, निविदा मंजुरीचा घटनाक्रम, सादरीकरण आदी माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या योजनेबाबत काही शंका असल्यास पाणीपुरवठा विभागाच्या शिवाजी मार्केट कार्यालयात वरील दिवशी सकाळी साडेदहा ते दीड वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)