तुकडाबंदीची अट शिथिल करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:48 IST2024-12-19T13:47:11+5:302024-12-19T13:48:56+5:30

नियमांमध्ये बदल केल्याची मंत्र्यांची माहिती

Relax conditions regarding fragmentation and consolidation of Maharashtra Dharan land MLA Satej Patil's demand in Legislative Council | तुकडाबंदीची अट शिथिल करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

तुकडाबंदीची अट शिथिल करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्र धारण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रीकरणाबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटींमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने सरकारने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. 

यावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घर, विहीर किंवा शेतकऱ्यांना गोठा बांधण्याची परवानगी देण्यासाठी ८ ऑगस्ट २०२३ ला नियमात बदल करून अधिसूचना काढली असून, अशा परवानग्या देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

बाजारमूल्यांच्या २५ टक्क्यांची अट असताना अर्ज केलेल्यांना ५ टक्क्यांचा लाभ मिळणार का, असा सवाल आमदार पाटील यांनी केला. यावर मंत्री विखे-पाटील यांनी ५ टक्के अधिमूल्याची सवलत १९६५ पासून २०२४ पर्यंत मिळणार असल्याचे सांगितले.

Web Title: Relax conditions regarding fragmentation and consolidation of Maharashtra Dharan land MLA Satej Patil's demand in Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.