शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘उपनिबंधक’चा लिपिक जाळ्यात

By admin | Updated: November 27, 2014 00:13 IST

पाच हजाराची लाच घेताना कऱ्हाडात अटक

कऱ्हाड : पतसंस्थेच्या सचिवाकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना उपनिबंधक कार्यालयाच्या सहकारी अधिकाऱ्याला (मुख्य लिपिक) रंगेहात पकडण्यात आले. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिबंधकच्या येथील कार्यालयात बुधवारी दुपारी सापळा रचून ही कारवाई केली.चंद्रशेखर रामचंद्र भुजबळ (रा. हमदाबाज, पो. कोंडवे, जि. सातारा) असे त्या मुख्य लिपिकाचे नाव आहे. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महिला पतसंस्थेचा एका कर्ज खात्यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. हे कर्ज खाते उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी चंद्रशेखर भुजबळ याच्यासमक्ष तडजोडीने बंद करण्यात आले. त्याचा मोबादला म्हणून चंद्रशेखर भुजबळ याने संबंधित पतसंस्थेच्या सचिवांकडे पाच हजार रूपयांची लाच मागितली. याबाबत संबंधित सचिवांनी लाचलुचपतच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपतच्या पथकाने बुधवारी दुपारी सापळा रचला. पतसंस्थेच्या सचिवांना लाचेची रक्कम घेऊन उपनिबंधक कार्यालयात पाठविण्यात आले. कार्यालयातच चंद्रशेखर भुजबळ याने त्या सचिवांकडून पाच हजारांची लाच स्वीकारली, त्यावेळी पथकाने भुजबळला रंगेहात पकडले. याबाबतचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिसांत नोंद करण्यात आला असून चंद्रशेखर भुजबळला ताब्यात घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीत मदत करण्याचेही आश्वासनज्या महिला पतसंस्थेच्या सचिवांनी लाचलुचपतकडे तक्रार केली, त्या पतसंस्थेची आगामी काळात निवडणूक होणार आहे. निवडणुकीवेळी याद्या दाखल करण्यासह इतर कामांत अडथळा न आणण्याचे आश्वासनही भुजबळने लाच मागताना सचिवांना दिले होते, अशी माहिती लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिली.