शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनानंतरही दुर्लक्षितच

By admin | Updated: December 19, 2014 00:10 IST

प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरूच : एन. डी. पाटील यांच्याकडून आंदोलकांची विचारपूस

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सलग दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरू राहिले. आज दिवसभरात या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करायला कोणाही शासकीय अधिकाऱ्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या मारण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या सुरू केले. महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ, वारणा आदी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या कुटुंबांसह भाग घेतला आहे. आज या प्रकल्पग्रस्तांशी कोणी तरी शासकीय अधिकारी चर्चा करून मार्ग काढेल, अशी अपेक्षा होती; परंतु कोणीही त्यांना चर्चेस बोलाविले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल मांडून प्रकल्पग्रस्त दुपारचे व रात्रीचे जेवण बनवत आहेत. मंडपात पंगती पडतात. आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. निर्णय झाले; परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ केली आहे. त्यामुळे आता आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा अशोक जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. (प्रतिनिधी)कडाक्याच्या थंडीतहीसध्या शहरात कडाक्याची थंडी पडली आहे तरीही सर्व आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याच्या फूटपाथवर बैठक मारली आहे. रात्रीच्या वेळी उघड्यावरच थंडीत झोपावे लागत आहे. सोबतीला प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळी वाद्ये आणली असून थोडा वेळ भजन, भक्तिगीते गायली जातात. महानगरपालिकेने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.