शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्के फी कमी करा, भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 15:58 IST

Education Sector Bjp Kolhapur : चालू शैक्षणिक वर्षातील फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालकांसोबत सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक् घेण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देपन्नास टक्के फी कमी करा, भाजपची मागणीउपसंचालक सोनवणे यांना निवेदन

कोल्हापूर : चालू शैक्षणिक वर्षातील फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालकांसोबत सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक् घेण्याचे आश्वासन दिले.दिड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. यामुळे आर्थिक चक्र मंदावले आहे. गोरगरीब, मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दरम्यान, सोमवार पासून शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होताच शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.

यापूर्वीही भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी निवेदनाव्दारे लक्ष वेधले होते. यावर शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालकांकडून कार्यवाही झालेली नाही. पण यापुढे जर शैक्षणिक फी सवलतीबाबत योग्य ती समाधानकारक कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना फी विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडले. मागण्यांचे फलक हातात घेवून लक्ष वेधले.निवेदन देताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा अध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप म्हेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रBJPभाजपाkolhapurकोल्हापूर