शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’; जिल्ह्यात वाढीव २६ दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ ...

नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती दिली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा पुरवठा कार्यालयाला १६ सप्टेंबरला मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या वाढणार आहे. पुरवठा विभागाने याची कार्यवाही सुरू केली असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये २६ नवीन रेशन दुकान होणार आहे. त्यासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ज्या गावांमध्ये रेशन धान्य दुकाने कमी आहेत, एकाच धान्य दुकानावर अधिक रेशनकार्डधारक आहेत अशा गावांमध्ये नव्याने रेशन दुकाने सुरू करण्यात येत आहेत. यानंतर देखील लोकसंख्येच्या मानाने वाढीव रेशन दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.

---

जिल्ह्यातील एकूण स्वस्त धान्य दुकाने - १६४१

कोल्हापूर शहर : १६६

इचलकरंजी : १०३

ग्रामीण भाग -१३७२

----

कोठे किती वाढणार

पन्हाळा : मौजे बहिरेवाडी, गुडे सोमवार पेठ, नावली, वारणा, पिंपळे तर्फ सातवे, मौजे कोतोली

कागल : बोरवडे, माद्याळ, पिंपळगाव खुर्द

शाहूवाडी : मोळावडे, वडगाव, करंजोशी, ओकोली, कोळगाव

करवीर : शिरोली दुमाला, येवती, खेबवडे, गर्जन, कळंबे तर्फ कळे, घानवडे, सोनतळी, वसगडे.

आजरा : दाभिल

गगनबावडा : पळसंबे, तळवे बुद्रूक, खोकुली.

--

लाभार्थ्यांची गैरसोय दूर होणार

एका रेशन दुकानाला २ हजार रेशनकार्डधारक असा नियम आहे. एकाच गावातील सर्व रेशन दुकानात त्यापेक्षा जास्त कार्डधारक असतील तर त्यांंच्यासाठी नवीन रेशन दुकानाची सोय असणार आहे. अनेक गावांमध्ये अजूनही रेशन धान्य दुकान नसल्याने तेथील नागरिकांना शेजारच्या गावात जाऊन धान्य आणावे लागते. त्यासाठी कित्येक किलोमीटर लांब जाणे, रांगेत थांबणे, धान्य नसेल तर, परत फेरी मारणे असा आटापिटा करावा लागतो.

--