Kolhapur Crime: शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने सराईत टोळीने काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:27 IST2025-07-19T13:27:34+5:302025-07-19T13:27:54+5:30

रांगोळी ग्रामपंचायत सदस्य खून प्रकरण : सराईत टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

Rangoli Gram Panchayat member Lakhan Annapappa Benade was murdered by a Sarait gang after they had sexual intercourse and threatened to broadcast the video | Kolhapur Crime: शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने सराईत टोळीने काढला काटा

Kolhapur Crime: शरीरसंबंध ठेवले, व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याने सराईत टोळीने काढला काटा

कोल्हापूर : महिलेशी शरीर संबंध ठेवले, त्याचे व्हिडीओ करून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन मानसिक, शारीरिक त्रास देणे, पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार करणे या रागातून रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन आण्णाप्पा बेनाडे यांचा सराईत टोळीने कायमचा काटा काढण्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या तपासातून शुक्रवारी पुढे आले. 

बेनाडे यांचा विशाल घस्ते व साथीदारांनी अपहरण केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तपास सुरू असताना विशाल घस्ते यास उजळाईवाडी येथील अर्जेंट कार वॉश सेंटर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे बेनाडे यांच्यासंबंधी चौकशी केली. त्यावेळी सुरुवातीस घस्ते याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्याने कारागृहात असल्याचे विशाल घस्ते याने पोलिसांना सांगितले. 

वाचा- पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार करत असल्याचा राग, रांगोळी ग्रामपंचायत सदस्याचा केला खून; महिलेसह पाचजणांना अटक

घस्ते कारागृहात गेल्यानंतर संबंधित महिला बेनाडे याच्याकडे बचत गटाच्या कर्ज मागणीसाठी गेली होती. बेनाडे याने तिचा गैर फायदा घेऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तिला घरीच ठेवून घेतले. त्याचे व्हिडीओ करून ते प्रसारित करण्याची धमकी दिली. वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.

दरम्यान, विशाल घस्ते कारागृहातून सुटला. त्यावेळी बेनाडे यांच्या घरातून ती महिला कोल्हापुरात आली. बेनाडे याने विशाल घस्ते आणि त्या महिले विरुद्ध वेगवेगळया पोलिस ठाण्यांत तक्रारी केल्या. बेनाडे १० जुलैला शाहूपुरी येथे आला होता. त्याने महिलेस मी तुमच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी मागे घेतो, तू माझ्या बरोबर चल, असे म्हणून बोलावून घेतले. त्या महिलेने विशाल घस्ते यालाही बोलावून घेतले. 

विशाल घस्ते आणि महिला राजेंद्रनगर येथे निघाले होते. त्यावेळी लखन बेनाडे हा सायबर चौकात होता. घस्ते याने साथीदार आकाश उर्फ माया दीपक घस्ते, संस्कार महादेव सावर्डे, अजित उदय चुडेकर यांनी बेनाडे याचा सायबर चौकातून कारमधून पाठलाग सुरू केला. त्यास शाहू टोल नाक्याजवळून जबरदस्तीने कारमध्ये घालून संकेश्वरला नेले. तेथे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. 

पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छडा लावून संशयित आरोपींना अटक केली.

Web Title: Rangoli Gram Panchayat member Lakhan Annapappa Benade was murdered by a Sarait gang after they had sexual intercourse and threatened to broadcast the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.