शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदही घरच्या घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे रमजानचे रोजे घरच्या घरीच केल्यानंतर आता ईदही घरातच आणि साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे. ...

कोल्हापूर : कोरोनामुळे रमजानचे रोजे घरच्या घरीच केल्यानंतर आता ईदही घरातच आणि साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे. चार दिवसांवर आलेल्या ईदनिमित्त शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये वर्दळ वाढली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद कशा पद्धतीने साजरी करायची, याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी बुधवारी हिलाल कमिटीची बैठक होत आहे.

मुस्लीम धर्मीयांतील पवित्र रमजान महिन्याची सांगता शुक्रवारी ईद साजरी करून होत आहे. यानिमित्त घराघरांत तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी बिंदू चाैकात होणारा ईद फेस्टिव्हल यावर्षी होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या जबाबदारीवर ईदसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करावयाची आहे. ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आल्याने आणि जेवणावळीवर बंदी असल्याने मोजक्याच लोकांसाठी खीर व जेवणाचे बेत सुरू आहेत.

रमजान ईदला घरोघरी शिरखुर्मा असतो, त्यासाठी लागणाऱ्या शेवया, गूळ, साखर, काजू, बदाम, खसखस, चारुले, पिस्ता, आक्रोड, खारीक, वेलदोडे, बेदाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत सकाळी ७ ते ११ या प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेत खरेदी सुरू आहे. यावर्षी या मसाल्याच्या दरात काहीशी वाढ दिसत आहे.

नवीन कपडे खरेदी नाही

ईद म्हटले की नवे कपडे आलेच; पण यावर्षीला याला मुरड घालावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे कपड्यांची दुकाने बंद असल्याने नवीन कपडे खरेदी अथवा शिवूनही घेता येत नाहीत. जुन्या ठेवणीतील कपड्यावरच ईद करावी लागणार आहे.

सामूहिक नमाज पठण नाही

मुस्लीम बोर्डिंग पटांगणासह जिल्ह्यात सर्व मशीद व ईदगाह मैदानावर ईदनिमित्त नमाज पठण होणार नाही. फक्त पाच जणांच्या उपस्थितीत मुस्लीम बाेर्डिंगमध्ये औपचारिक पद्धतीने नमाज पठाण होईल, असे मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सांगितले.