अहो अश्चर्यमं! वय अवघं सहा वर्ष, गुगुल सर्च प्रमाणे पटापट सांगतोय दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याची तारीख, वार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 07:38 PM2023-07-10T19:38:59+5:302023-07-10T19:40:10+5:30

गावकर्‍यांना आश्चर्याचा धक्का : अजब ज्ञानाबद्दल कुतहुल

Rajveer Kiran Patil of Pimple Tarap Thane in Panhala Taluka of Kolhapur District says that the date of any month in the calendar, | अहो अश्चर्यमं! वय अवघं सहा वर्ष, गुगुल सर्च प्रमाणे पटापट सांगतोय दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याची तारीख, वार

अहो अश्चर्यमं! वय अवघं सहा वर्ष, गुगुल सर्च प्रमाणे पटापट सांगतोय दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याची तारीख, वार

googlenewsNext

विक्रम पाटील

करंजफेण : अहो अश्चर्यमं एखादयाने नावजलेल्या विद्यापीठामधून शिक्षण घेऊन यावे आणि विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तर दयावी असाच प्रकार पन्हाळा तालुक्यातील पिंपळे तर्फ ठाणे येथील राजवीर किरण पाटील या पहिलीत शिकणार्‍या बालकाच्या बाबतीत घडलाय. दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याची तारीख, वार असो राजवीर गुगुल सर्च प्रमाणे पटापट सांगतोय. त्याला अजून म्हणावे तसे लिहिता वाचता येत नाही. कोणत्याही वर्षातील सणवार देखील तो तंतोतंत सांगत त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थही आश्चर्यचकीत झाली आहेत.

किरण कृष्णात पाटील हे शेती करतात त्यांचा सहा वर्षाचा मुलगा राजवीर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकतोय. त्याच्या शिक्षणाचा श्रीगणेशा नुकताच  झाला आहे.  मुळाअक्षरे, अंकलेखन किंवा इंग्रजीचे ज्ञान अजून तरी अवगत नाही.पण आश्चर्याची बाब अशी की,दिनदर्शिकेतील माहिती मात्र राजवीरला चांगलीच अवगत झाली आहे.  विचारलेल्या प्रश्नाची दिलेली उत्तरे ऐकून ऐकणारा देखील थक्क होऊन जातो. एवढ्या लहान वयात त्याला एवढे ज्ञान आले कुठून हा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडल्याने ते अवाक झाले आहेत.

राजवीरला जर तुम्ही दिनदर्शिकेमधील कोणत्याही महिन्याचे व कोणत्याही वर्षाची तारीख, वार, तिथी, जयंती, सणवार विचारले तर तो चुटकीसारख सांगत आहे. पुढे येणार्‍या वर्षभरातील तारीख,वार सण जयंत्या विचारल्या तरी देखील तो  गुगल सर्च प्रमाणे पटापट उत्तर देत आहे. ते पाहून लोक तोंडात बोटे घालत आहेत.

राजवीरचे वडील किरण व आई सुषमा यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाल आहे. बहिण मधुरा तिसरीत शिकते. शेतकरी कुटुंबातील या मुलाचा वेगळा अभ्यास घ्यायला कोण नाही..पण त्याचे कोशल्य पाहून लोक अचंबित होत आहेत एवढे नक्की.    

राजवीरच्या कौशल्याबद्दल आम्हाला  कधी काही जाणवले नाही.त्यानेच स्वत:हून आम्हाला दिनदर्शिकेमधील  मला काहीही विचारा म्हणून सांगितले त्यानंतर आम्ही त्यास चालू वर्षातील, मागील आणि आगामी दोन वर्षातील माहिती विचारल्यानंतर त्याने दिलेली उत्तरे पाहून आम्हाला काही कळेनासे झाले. - किरण पाटील

Web Title: Rajveer Kiran Patil of Pimple Tarap Thane in Panhala Taluka of Kolhapur District says that the date of any month in the calendar,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.