शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी देणार तिसरा पर्याय ?

By admin | Updated: July 9, 2014 01:07 IST

विधानसभा : नाराजांना एकत्रित करणार

विश्वास पाटील / कोल्हापूर शिवसेना-भाजपसह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार राजू शेट्टी व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न आहेत. साखरपट्ट्यातील मातब्बर नेत्यांची एकजूट करून किमान ४५ जागा लढविता येतील का, यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीला एकत्र बांधून ठेवणारा नेता नसल्याने शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला विधानसभेच्या २४५ मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने नेते हवेत आहेत. दोन्ही काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. शिवसेना-भाजपनेही तसाच शड्डू ठोकला तरी हे दोन्ही पक्ष युतीतर्फे एकत्रच लढणार हे स्पष्ट आहे. परंतु, मुंडे यांच्या निधनानंतर या दोन्ही पक्षांतील जो समन्वयाचा धागा होता तो आता तुटल्याचे महायुतीतीलच नेत्यांनाही जाणवू लागले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत दुफळी आहेच, शिवाय या दोन पक्षांतील कुरघोडीचे राजकारणही वाढले आहे. त्यामुळेच सांगलीतून भाजपचे नाराज आमदार संभाजी पवार यांच्या मुलाऐवजी नीता केळकर यांना उमेदवारी देण्याचा आग्रह खासदार संजय पाटील यांच्याकडून धरला जात आहे. प्रकाश शेंडगे व सुरेश खाडे यांच्या उमेदवारीवरूनही अशीच रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणूक वेगळी व विधानसभेचे राजकारण वेगळे असते. कारण विधानसभेला स्थानिक राजकारणाचा रंग असतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत किमान शंभराहून जास्त आमदार असे आहेत की, गेली वीस वर्षे त्यांच्याच घराण्यात आमदारकी आहे. तेच लोक सरड्यासारखे रंग बदलून सत्ता मिळवतात. हे बदनाम लोक आहेत हे खरे असले तरी त्यांचा पराभव करणेही सोपे नाही. कोल्हापूरपासून लातूरपर्यंत गेली अनेक वर्षे प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात सातत्याने संघर्ष करणारे नेतेही आहेत. त्यांचा महायुती विचार करायला तयार नाही. परंतु, जे दलबदलू आहेत, त्यांना पुन्हा पायघड्या घातल्या जात आहेत. पर्याय चांगला दिला तरच लोक विश्वास ठेवतात. परंतु, प्रत्यक्षात उलटेच घडत असल्याने शेट्टीही नाराज आहेत. साखरपट्ट्यातील हे नेतृत्व थेट शिवसेना-भाजपची उमेदवारी घेण्यास तयार नाही. कारण त्यांची पाळेमुळे दोन्ही काँग्रेसच्या राजकारणात रूजली आहेत. त्यांना स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून असा काही तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास त्यांची लढण्याची तयारी आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रमुख पक्षांतील नाराज नेत्यांना एकत्र करून काही वेगळेच व्यासपीठ स्थापन करता येईल का, अशा हालचाली सुरू आहेत. ज्यांना दोन्ही काँग्रेसचा कंटाळा आला आहे परंतु शिवसेना-भाजपलाही मतदान द्यायचे नाही, अशा लोकांना हा पर्याय असू शकेल.