Kolhapur Politics: राजू शेट्टींचे बोलवते धनी सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:09 IST2025-07-28T17:08:29+5:302025-07-28T17:09:22+5:30
कोल्हापूर : शक्तिपीठवरून माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे बगलबच्चे माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांचे बोलवते धनी आमदार ...

Kolhapur Politics: राजू शेट्टींचे बोलवते धनी सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांचा आरोप
कोल्हापूर : शक्तिपीठवरून माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे बगलबच्चे माझ्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत. त्यांचे बोलवते धनी आमदार सतेज पाटील आहेत, असा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
माझ्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी ८५ लाखांची वैद्यकीय बिले शासनाकडून घेतल्याचा आरोप सिद्ध करून दाखवा, मी राजकीय संन्यास घेतो. जर हा आरोप सिद्ध केला नाही तर आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असेही आव्हानही त्यांनी दिले.
ते म्हणाले, शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघातील फेर मतपडताळणीच्या निकालानंतर विरोधकांचा रडीचा डाव उघडा पडला आहे. महापालिकेत भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. त्याला आता ठेचले जाईल. हद्दवाढीत येण्यासाठी आठ गावांनी विरोधात ठराव केला आहे. त्यांचा विरोध डावलून हद्दवाढ होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.