राजलक्ष्मीकरांचा कौल मिलिंद पाटील यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:20 IST2021-01-04T04:20:53+5:302021-01-04T04:20:53+5:30
कळंबा : यंदाच्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ७० राजलक्ष्मीनगर सर्वसाधारण खुला झाला असल्याने राजलक्ष्मीनगरातर्फे एकच उमेदवार निश्चित करण्यासाठी ...

राजलक्ष्मीकरांचा कौल मिलिंद पाटील यांना
कळंबा : यंदाच्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ७० राजलक्ष्मीनगर सर्वसाधारण खुला झाला असल्याने राजलक्ष्मीनगरातर्फे एकच उमेदवार निश्चित करण्यासाठी राजलक्ष्मी तरुण मंडळ व वीर सावरकर विश्वस्त ट्रस्ट यांच्यावतीने पोटनिवडणूक प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली. यात मिलिंद पाटील यांनी बाजी मारली. रविवारी सकाळी आठ ते तीन प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवून सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अंदाजे दोन हजार मतदारांपैकी ६५४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १४ मते बाद, तर ४० जणांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. मिलिंद पाटील यांना ३७९ मते, तर इंद्रजित साळोखे यांना २२१ मते मिळाली. मिलिंद पाटील १५८ मतांनी विजयी झाले.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ७० यंदाच्या पालिका सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसाधारण खुला जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची मांदियाळी प्रभागात पाहावयास मिळाली. अटीतटीच्या निवडणुकीत राजलक्ष्मीनगरातील अंदाजे दोन हजार मतदार निर्णायक भूमिका बजावतात. यंदा राजलक्ष्मी नगरातील रहिवासी नगरसेवक व्हावा यासाठी इच्छुक दोन उमेदवारांतून एक उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रभागात पोटनिवडणूक प्रक्रिया राबविली. विजयी उमेदवाराच्या मागे सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
चौकट
निर्णायक मतांसाठी कसरत
राजलक्ष्मीनगर प्रभागात अंदाजे चाळीस लहान मोठ्या कॉलण्यांचा समावेश होतो. राजलक्ष्मीनगरातील चार, तर अन्य कॉलन्यांमधील सहा इच्छुक उमेदवार सद्या रिंगणात आहेत. येथे पक्षीय राजकारण मोठे चालते. येथे विजयी होण्यासाठी किमान १४०० मतदान मिळविणे गरजेचे ठरते. त्यामुळे सर्वच उमेदवारांना निर्णायक मतांसाठी कसरत करावी लागणार आहे. पोटनिवडणुकीतील दोन हजार मतांपैकी झालेले मतदान पाहता मत विभागणी अटळ आहे.
फोटो ०३ राजलक्ष्मीनगर निवडणूक
मेल केला आहे
फोटो ओळ प्रभाग ७० राजलक्ष्मीनगर मधील राजलक्ष्मीनगरात एकच उमेदवार निश्चित करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.