राजेश क्षीरसागर यांचा जयश्री जाधव यांनी केलेल्या कामांवर डल्ला; भारती पोवार यांचा आरोप

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 2, 2023 04:00 PM2023-10-02T16:00:06+5:302023-10-02T16:02:31+5:30

जाधव यांच्या कामांचे श्रेय लाटून कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धुळफेक

Rajesh Kshirsagar should not take credit for the works done by Jayashree Jadhav says Bharti Powar | राजेश क्षीरसागर यांचा जयश्री जाधव यांनी केलेल्या कामांवर डल्ला; भारती पोवार यांचा आरोप

राजेश क्षीरसागर यांचा जयश्री जाधव यांनी केलेल्या कामांवर डल्ला; भारती पोवार यांचा आरोप

googlenewsNext

कोल्हापूर : आमदार जयश्री जाधव यांच्या मागणीनंतर रंकाळा संवर्धनासाठी ३.५८ कोटींचा निधी मंजूर झाला, दिगंबर फराकटे यांच्यावरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाला, हद्दवाढीसाठी त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे, पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे जाधव यांच्या कामांचे श्रेय लाटून कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धुळ फेकत आहेत. एवढेच असेल तर त्यांनी नवी कामे करून निवडणुकीसाठी जनतेसमोर जावे, अन्य लोकप्रतिनिधींच्या कामांवर डल्ला मारणे खपवून घेतला जाणार नाही. नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

त्या म्हणाल्या, आमदार जयश्री जाधव या प्रसिद्धी न करता विकासाचे व मदतीचे काम करत आहेत. रंकाळा संवर्धन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा हद्दवाढीसाठीचे प्रयत्न याबाबतची कागदपत्रे व पुरावे त्यांच्याकडे असताना क्षीरसागर हे महिला आमदाराला त्रास देत आहेत. खोटे बोलून त्यांच्या कामांचे श्रेय लाटत आहेत. अधिवेशन काळात जाधव यांनी कोल्हापूरच्या हद्दावाढीकडे शासनाचे लक्ष वेधले, त्यावर प्रशासकीय हालचाली सुरू असताना क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सांगण्यावरून बैठक घेतल्याची खोटी बातमी दिली. मुख्यमंत्री कार्यालयातून १ सप्टेंबरपासूनच्या कामकाजाची माहिती घेतली असता अशी बैठक झाली नसल्याचे सांगण्यात आले.

रंकाळा संवर्धनाबाबत क्षीरसागर यांचे पेड पदाधिकारी व टेंडरवाले सुजित चव्हाण हे जाधव यांच्यावर आरोप करत आहेत. प्रशासकीय कामाचे, लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे ज्ञान नसलेल्यांनी त्यांच्याबद्दल बोलू नये, रंकाळा संवर्धनासाठी जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या पत्रानंतर समितीने आयुक्तांना २८ ऑगस्टला मंजुरीचे पत्र दिले. त्या पत्राच्या संदर्भसुचीत जाधव यांच्या पत्राचा स्पष्ट उल्लेख आहे.

Web Title: Rajesh Kshirsagar should not take credit for the works done by Jayashree Jadhav says Bharti Powar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.