शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विजयाची हॅटट्रिक मीच करणार  : राजेश क्षीरसागर यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 4:10 PM

निवडणुका येतात जातात, मी निवडणुक आली म्हणून कधी काम केलो नाही. जनतेत राहून जनतेच्या अडचणी सोडवल्या, टोल, एलबीटीसारख्या चळवळी, रुग्ण सेवा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. त्या बळावरच येत्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देविजयाची हॅटट्रिक मीच करणार  : राजेश क्षीरसागर यांचा विश्वासभगिनी महोत्सवाचे शानदार उदघाटन

कोल्हापूर : निवडणुका येतात जातात, मी निवडणुक आली म्हणून कधी काम केलो नाही. जनतेत राहून जनतेच्या अडचणी सोडवल्या, टोल, एलबीटीसारख्या चळवळी, रुग्ण सेवा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. त्या बळावरच येत्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर भगिनी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, नगरसेविका अनुराधा खेडकर, तेजस्विनी इंगवले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, नगरसेवक नियाज खान, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, मंगल साळोखे, पूजा भोर उपस्थित होत्या. हा महोत्सव उद्या रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.क्षीरसागर म्हणाले, निवडणुका आल्या की लोक जनतेसमोर येतात. आता माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय पण मी घाबरत नाही. भगिनी महोत्सव, युवा महोत्सव, ढोल ताशा स्पर्धा, गणेशोत्सव, श्रावण महोत्सव अशा विविध उपक्रमातून जनतेत राहतो. विधानसभेत कोल्हापुरचे प्रश्न मांडण्यापासून ते निकाली लागेपर्यंत त्यांचा पाठपुरावा आणि चळवळीत कार्यरत आहे. नागरिकांना माझं काम माहित आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्या पाठबळावरच मी पुन्हा निवडून येईन.महापौर सरिता मोरे यांनी महोत्सवामुळे महिला व बचत गटांना आर्थिक बळ मिळाल्याचे सांगितले. वैशाली क्षीरसागर यांनी प्रास्ताविकांत महिलांना मान सन्मान व सांस्कृतिक विरंगुळा मिळत असल्याचे सांगितले. ऋतुराज क्षीरसागर यांनी स्वागत केले. ऋषिकेश देसाई यांनी सुत्रसंचलन केले. दुपारच्या सत्रात लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाल्या. सायंकाळी मेघा घाटगे व ग्रूपने लावण्यरंग हा लावण्यांचा कार्यक्रम सादर केला.

 

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर