Kolhapur ZP Election 2026: शिरोळमध्ये यड्रावकरांच्या पॉवर गेमने महाविकासची समीकरणे बिघडवली, भाजपसमोर नवी आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:08 IST2026-02-11T19:07:03+5:302026-02-11T19:08:03+5:30

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला आता शून्यातून बांधणी करावी लागणार

Rajendra Patil-Yadrawkar's power game in Shirol has disrupted the equations of Mahavikas, new challenges face BJP | Kolhapur ZP Election 2026: शिरोळमध्ये यड्रावकरांच्या पॉवर गेमने महाविकासची समीकरणे बिघडवली, भाजपसमोर नवी आव्हाने

Kolhapur ZP Election 2026: शिरोळमध्ये यड्रावकरांच्या पॉवर गेमने महाविकासची समीकरणे बिघडवली, भाजपसमोर नवी आव्हाने

संदीप बावचे

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनी ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्वाची नवी समीकरणे स्पष्ट केली आहेत. या निकालाने महाविकास आघाडीसाठी आत्मचिंतनाची गरज अधोरेखित केली असतानाच, भाजपला आपल्या मर्यादा आणि संधींची जाणीव करून दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची रणनीती तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

ग्रामीण बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला अपेक्षित पकड निर्माण करता आलेली नाही. जि.प., पं.स. निवडणुकीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, उध्दवसेना यांनी एकत्र मोट बांधली. माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी जागा वाटपाचे धोरण राबवून यश मिळविण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पेरणी या निवडणुकीत दिसून आली नाही. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला आता शून्यातून बांधणी करावी लागणार आहे.

भाजपने या निवडणुकीत ग्रामीण भागातील आपल्या ताकदीचा अंदाज घेतला आहे. जरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरीही नव्याने राजकीय बांधणी करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. विखुरलेल्या मतप्रवाहांना एकत्र आणण्याचे काम भाजपने केले आहे. येणाऱ्या काळात भाजपचे सावकर मादनाईक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे पक्षाची कशी बांधणी करतात यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

आमदार यड्रावकर यांनी आखलेली व्यूहरचना यशस्वी झाल्याचे चित्र आहे. महायुतीच्या झेंड्याखाली काम करताना त्यांनी आपल्या समर्थकांना बळ दिले आणि ग्रामीण भागातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. यड्रावकर यांना मिळालेल्या यशामुळे आता भाजपची भूमिका कळीची ठरणार आहे. येणाऱ्या काळात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले अमोल चव्हाण यांनी यापूर्वी मौजे आगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले होते. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेल्या अर्चना चौगुले यापूर्वी पंचायत समिती सदस्या होत्या. पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेले चौदा उमेदवार हे नवे चेहरे ठरले आहेत.

कोणाला किती मते

शिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडी व शाहू आघाडीने सात जागा तर भाजपने चार जागा लढविल्या होत्या. जि.प. मतदारसंघातून शाहू आघाडीला ७३१५४, महाविकास आघाडीला ५८५१२ तर भाजपला ३०३७३ अशी मते मिळाली.

Web Title : कोल्हापुर ZP चुनाव: येडरावकर के पावर प्ले से गठबंधन बिगड़ा, बीजेपी को चुनौती।

Web Summary : येडरावकर की रणनीति ने कोल्हापुर के राजनीतिक परिदृश्य को नया रूप दिया। परिणामों ने महा विकास अघाड़ी गठबंधन में कमजोरियों को उजागर किया और आगामी चुनावों में बीजेपी के लिए अवसरों पर प्रकाश डाला। भविष्य के चुनावों से पहले गठबंधन को मजबूत करने की आवश्यकता है।

Web Title : Kolhapur ZP Election: Yadravkar's Power Play Disrupts Alliances, Challenges BJP.

Web Summary : Yadravkar's strategy reshaped Kolhapur's political landscape. The results exposed weaknesses in the Maha Vikas Aghadi alliance and highlighted opportunities for the BJP in upcoming elections. Alliances need strengthening before future polls.