शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

राजाराम कारखाना: सतेज पाटील यांना पराभव पचलेला नाही, अमल महाडिकांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 12:31 PM

राज्य सरकारकडे अपील करणार

कोल्हापूर : कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैरमार्गाने सभासदांवर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही. सतेज पाटील यांना राजारामचा पराभव पचलेला नाही, असा टोला कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी गुरुवारी प्रसिध्दीपत्रकातून लगावला. अपात्र ठरवलेले सभासद १२७२ नसून फक्त ८२४ असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे.पत्रकात म्हटले आहे, सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले वक्तव्य बालिशपणाची आहेत. प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी संबंध नसताना कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणुकीसंंबंधी दिशाभूल करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याचपुरता मर्यादित आहे. त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काहीतरी करून दाखवत आहे असे भासवण्याचा प्रयत्न आहे.

या निकालामध्ये मोठमोठी आकडेवारी सांगून सभासदांमध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव ते करीत आहेत. निवडणुकीत मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झाले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. खरे पाहता २१-० झालेला दारुण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही.

राज्य सरकारकडे अपील करणारप्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आदेश दिला आहे. आदेश आणि त्यांच्याविरुध्द अवमान याचिका दाखल करणार आहे. निकालाविरोधात राज्य सरकारकडे अपील करणार आहे. प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश सभासद, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधात आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक