शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

कच्चा मालाच्या दरवाढीने उद्योगांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 11:29 IST

पिग आर्यन, कॉपर, निकल, आदी कच्चा मालाच्या दरवाढीने नवी अडचण उद्योगांसमोर उभारली आहे. गेल्या दीड वर्षांत कच्च्या मालाचे दर १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

संतोष मिठारीकोल्हापूर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती आणि आव्हानांचा सामना करत कोल्हापुरातील उद्योगचक्र सुरू आहे. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव, ऑर्डर्सचे वाढलेले प्रमाण, मनुष्यबळाची उपलब्धता, आदी पूरक घटकांच्या सहाय्याने फौंड्री हब असलेले औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहे. मात्र, पिग आर्यन, कॉपर, निकल, आदी कच्चा मालाच्या दरवाढीने नवी अडचण उद्योगांसमोर उभारली आहे. गेल्या दीड वर्षांत कच्च्या मालाचे दर १५ ते १५० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

ऑर्डर्सचे प्रमाण वाढल्याने हातात काम असूनही उद्योजकांना गती घेता येत नाही. जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्योग पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन कच्चा मालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने आणि लवकर लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी उद्योजकांतून होत आहे. जगातील विविध देशांनी चीनवर अलिखित बहिष्कार टाकल्याने कास्टिंगसाठी कोल्हापुरातील फौंड्रीच्या ऑर्डर्स सरासरी १५ टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे साहजिकच औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांचे काम वाढले. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत विचार करता कारखान्यांमधील काम ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत पूर्वपदावर आले आहे. उद्योजक काय सांगतात?

ऑर्डर्स चांगल्या आहेत. मात्र, कच्चा मालाचे वाढते दर अडचणीचे ठरत आहेत. सध्या उत्पादनाची क्षमता बहुतांश कारखाने दोन ते तीन शिफ्टमध्ये सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहे.  -उत्तम पाटील, शिरोली एमआयडीसी

कच्चा मालाचे दर वाढत असल्याने उद्योगांच्या भांडवलावर ताण पडत आहे. दिवाळीनंतर थोडासा स्लोडाऊन दिसत आहे. उद्योगचक्राची गती वाढण्यासाठी कच्चा मालाचे दर कमी होणे खूप आवश्यक आहे. -दिनशे बुधले, सचिव, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशन

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे काम निश्चितपणे वाढले आहे. ते पूर्ण करण्यात कच्चा मालाच्या वाढणाऱ्या दराचे आव्हान आहे. ते दूर झाल्यास कामाची गती आणखी वाढणार आहे. -गोरख माळी, अध्यक्ष, मॅकजुलै २०२२ पर्यंतच्या कामाच्या ऑर्डर्स जिल्ह्यातील विविध कारखान्यांना मिळाल्या आहेत. मात्र, महिन्यागणिक पिग आर्यन, स्क्रॅप, आदी कच्चा मालाचे दर वाढत आहेत. त्यामुळे उद्योजकांची अडचण होत आहे. कच्चा मालाचे दर नियंत्रणात ठेवण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने लवकर लक्ष देणे आवश्यक आहे. - श्रीकांत पोतनीस, गोकूळ शिरगाव एमआयडीसी

 

असे वाढले कच्चा मालाचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

कच्चा माल                                    डिसेंबर २०१९             डिसेंबर २०२०                         नोव्हेंबर २०२१पिग आर्यन                                     ३०.४७                         ३३.५५                                                 ५०

सीआय स्क्रॅप                                    ३०.५०                         ३८                                                 ४८.५०एमएस स्क्रॅप                                     २६                              ३७                                                 ४७.५०

कोळसा                                            ३३.५०                           ३३                                                  ४९फेरो सिलीकॉन                                 १३०                               -                                                    २२०

फेरो मॅन्गेनिज                                  ८८                                 -                                                   २४०

तर, फौंड्री उद्योग बंद पडणार

-फौंड्री उद्योग सुरू झाला असला, तरी मोठ्या समस्यांना तोंड देत आहे. कामे कमी झाली असून त्यातही आठवड्यातील तीन दिवस बंद ठेवावे लागत आहेत. पिग आर्यन, कोळसा, सिलीकाॅन, मॅग्नीज, सीआय स्क्रॅप मटेरियलचे दर दुप्पट झाले आहेत. -कच्चा मालाच्या वाढीव किमतीप्रमाणे मोठ्या कंपन्या वाढीव दर देत नाहीत. त्यामुळे कोल्हापुरातील फौंड्री उद्योजक हा नुसता हमालीच करत आहे. कच्च्या मालातील दरवाढ अशीच सुरू राहिली, तर फौंड्री उद्योग बंद पडेल. -केंद्र, राज्य शासनाने, लोकप्रतिनिधींनी यात वेळीच लक्ष घालून दरवाढ कमी करण्यासाठी तातडीने उपाय करावेत, अशी मागणी फौंड्री उद्योजक हिंदूराव कामते यांनी केली.

दरमहा लागतो ८० हजार टन कच्चा माल

जिल्ह्यात दरमहा ७५ हजार टन कास्टिंगचे उत्पादन होते. त्यासाठी पिग आर्यन, स्क्रॅॅप, कॉपर, निकल, फेरोऑलॉई, फेरोसिलिकॉन असा सुमारे ८० हजार टन कच्चा माल लागतो. त्याची एकूण किंमत सुमारे ८०० कोटींपर्यंत जाते. या कच्च्या मालाचा पुरवठा मुंबई, पुणे, जालना, नागपूर, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम येथून होतो.

आकडेवारी दृष्टिक्षेपातकोल्हापूर विभागातील फौंड्रींची संख्या : ३००कामगारांची संख्या : दीड लाखदरमहा उत्पादन : ७५ हजार टनवार्षिक उलाढाल : एक हजार कोटी

औद्योगिक वसाहतनिहाय उद्योगांची संख्याशिवाजी उद्यमनगर : ८५०शिरोली            : १०००गोकुळ शिरगाव : ८००  कागल हातकणंगले : ४५०         

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या