शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

स्वच्छता मोहिमेमध्ये आठ टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 11:55 IST

कोल्हापूर : शहरामध्ये महास्वच्छता अभियानामध्ये रविवारी आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.

ठळक मुद्देस्वच्छता मोहिमेमध्ये आठ टन कचरा उठावज्येष्ठ नागरिकांसह ‘एन.सी.सी.’च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : शहरामध्ये महास्वच्छता अभियानामध्ये रविवारी आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.

मोहिमेचा हा एकेचाळिसावा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विवेकानंद कॉलेज, राजाराम महाविद्यालयाचे २०० पेक्षा जास्त एन.सी.सी.चे विद्यार्थी सहभागी झाले होते. याचबरोबर वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.यावेळी नगरसेविका गीता गुरव, रिया गुरव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर भोगम, स्वच्छतादूत अमित देशपांडे, शाखा अभियंता आर.के. पाटील, महाराष्ट्र आर्टिलरी बॅटरीचे कमांडिंग आॅफिसर कर्नल संजीव सरनाईक, सुभेदार मेजर मुकेश कुमार, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, राजाराम विद्यालयाचे एन.सी.सी. आॅफिसर लेफ्टनंट डॉ. विश्वनाथ बिटे, महावीर कॉलेजचे एन.सी.सी.चे आॅफिसर लेफ्टनंट उमेश वांगदरे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेडे उपस्थित होते.

शासकीय कार्यालये प्लास्टिकमुक्त करणार : आयुक्त डॉ. कलशेट्टीविविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वाईट प्रवृत्तीचे प्रबोधन करून युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोल्हापूर शहर १ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त करण्याचा मानस आहे. यासाठी शहरातील सर्व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये ही प्लास्टिकमुक्त करणार आहे.

शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक यांची एकत्रितपणे बैठक आयोजित करून त्यांच्यात प्लास्टिकबाबत जनजागृती करणार आहे. तसेच शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी मानवी साखळीद्वारे प्लास्टिकबंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाण्याच्या बचतीबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन प्रबोधन करणार आहे.

स्वच्छ केलेला परिसरपंचगंगा नदीघाट, रिलायन्स मॉलच्या पिछाडीस, हुतात्मा पार्क, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप व माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी मार्केट, टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते लोणार वसाहत मेन रोड, कोटीतीर्थ तलाव, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर परिसर तसेच कळंबा तलाव.महापालिकेची यंत्रणा४ जेसीबी, ७ डंपर, ६ आरसी गाड्या.

मोहिमेची वैशिष्ट्ये

  • पंचगंगा नदीघाट येथे प्लास्टिकबंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाण्याची बचत यांबाबत जनजागृती फलक हातात घेऊन जनजागृती.
  • एन.सी.सी. विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता.
  • बालचमूंसह ज्येष्ठांचा सहभाग.

 

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर