घरात घुसले पावसाचे पाणी, सात जणांना काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 23:32 IST2020-08-05T19:50:09+5:302020-08-05T23:32:34+5:30
:ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे श्रीमान योगी कॉलनी,कळंबा रिंगरोड,नवीन वाशी नाका परिसर येथे पाण्याचा घरात शिरकाव झाला आहे. दरम्यान जगतापनगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

घरात घुसले पावसाचे पाणी, सात जणांना काढले बाहेर
कोल्हापूर :ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे श्रीमान योगी कॉलनी,कळंबा रिंगरोड,नवीन वाशी नाका परिसर येथे पाण्याचा घरात शिरकाव झाला आहे.
दरम्यान जगताप नगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.
कोल्हापूर मनपाचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दोन महिन्यापूर्वी परिस्थितीचा आढावा घेतला होता, पण कोणतेही उपाययोजना झालेली नाही.
शासन आणि नगरसेवक यांच्याकडून कोणतेही सहकार्य न मिळाल्यामुळे नागरिकाची प्रचंड गैरसोय होत असून,याचा तीव्र संताप उमटत आहे.द
दरम्यान जगत्तापनगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.
स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला,विनायक लिमकर, रवी ठोंबरे, किरण पोवार या जवानांनी या मोहिमेत भाग घेतला.