Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:34 PM2022-08-12T12:34:54+5:302022-08-12T12:58:57+5:30

राधानगरी धरणातून ७ हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Rain intensity reduced in Kolhapur, Water level of Panchganga near danger level, 76 dams under water | Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच

Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच

googlenewsNext

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी गुरुवारी दिवसभर चार इंचांनी वाढून ४१ फूट आठ इंचांवर पोहोचली. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी वाढण्याचा वेग मंदावला आहे; पण पाणी पातळी धोका पातळीकडे जात असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, पाटबंधारे प्रशासनाने राधानगरी धरणातून ७ हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यातील एकूण ७६ बंधारे पाण्याखाली आहेत.

शहर आणि जिल्ह्यात दिवसभर पाऊस राहून राहून कोसळत राहिला. सकाळी लख्ख ऊन पडले होते. श्रावणातील ऊन-पाऊस वातावरणाचा अनुभव घेता आला. तळ कोकणातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरदार राहिला. यामुळे राधानगरीसह जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यातील एक दरवाजा बंद होवून सध्या चार स्वयंचलित दरवाजे खुले असून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.

दिवसभर जिल्ह्यात सरासरी २६.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ६५ मिलिमीटर पावसाची नोंद आजरा तालुक्यात झाली आहे. सर्वच नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा अधिक आहे. पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील ५ कुटुंबांतील २२ जण, तर करवीर तालुक्यातील चिखलीतील ४८८ कुटुबांंतील १६७१ जण नातेवाइकांकडे स्थलांतर झाले आहेत. एकूण १७५३ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

कसबा बावडा-शिये रस्ता बंद

कसबा बावड्यातून शिये फाट्यावर जाणाऱ्या रस्त्यावर टोलनाक्याजवळ पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

बंद रस्ते असे :
राष्ट्रीय महामार्ग :कोल्हापूर-वैभववाडी, कोल्हापूर-रत्नागिरी.
राज्यमार्ग : कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज-कोदाळी-भेंडशी, चिखली, वरणगे पाडळी- बाजारभोगाव-अनुस्करा, चंदगड- इब्राहिमपूर, बोरपाडळे- वाठार-वडगाव- हातकणंगले, अतिग्रे -कबनूर- इचलकरंजी-शिरढोण- टाकळी- खिद्रापूर, निढोरी-गोरंबे-कागल-यळगूड-रेंदाळ.

एसटीचे बंद असलेले मार्ग : कोल्हापूर ते गगनबावडा, इचलकरंजी ते कुरुंदवाड, गडहिंग्लज ते ऐनापूर, मलकापूर ते शित्तूर, चंदगड ते दोडामार्ग, गगनबावडा ते करूळ घाट, आजरा ते देवकांडगाव.

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे आज, शुक्रवारी सकाळी दहा उघडण्यात आले असुन कोयना नदीत एकुण १०१०० क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सुरक्षतेच्या कारणास्तव कोयना कृष्णानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Web Title: Rain intensity reduced in Kolhapur, Water level of Panchganga near danger level, 76 dams under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.