शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Rain Update Kolhapur: पावसाचा जोर ओसरला मात्र, पंचगंगा धोका पातळीकडेच; 500 कुटुंबे स्थलांतरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 12:28 IST

पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, गुरुवारी अन् काल बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, सकाळी पंचगंगेची पातळी 41 फूट 7 इंच इतकी असून, धोक्याच्या पातळीच्या (43 फूट) दिशेने वाटचाल सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केले आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे आदी गावांमधील हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.सोमवारी, मंगळवारी असणारा पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. पावसाने सकाळपासूनच उघडीप देत सूर्यनारायणाने दर्शन दिले होते. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. मात्र, काल, बुधवारी पहाटे पाच वाजता राधानगरी धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला. एकापाठोपाठ एक असे चार दरवाजे खुले झाल्याने भोगावती नदीच्या पाण्याची तुंबी वाढत गेली. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. दिवसभरात फुटाने पातळीत वाढ झाली असली तरी धोका पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये स्थलांतर सुरू केले आहे.

अलमट्टीतून विसर्ग वाढवलापावसाने उघडीप दिली असली तरी पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे महापुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून प्रतिसेकंद 2 लाख घटफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

उघडीप असली तरी पातळी स्थिर राहणारराधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले तर ते पाणी पंचगंगेपर्यंत येण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तरी पंचगंगेची पातळी स्थिर राहणार आहे.

चिखली, आंबेवाडीतील 500 कुटुंबे स्थलांतरित

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावात अद्याप पुराचे पाणी आले नसले तरी दक्षता बाळगत जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांतील जवळपास 500 कुटुंबे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केली आहेत.

कोल्हापूर-केर्ली मार्गावर पाणीकोल्हापूर ते केर्ली दरम्यानच्या रस्त्यावर दीड फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक जोतिबामार्गे वळवण्यात आली आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाइचलकरंजी ते कुरुंदवाडगडहिंग्लज ते ऐनापूरमलकापूर ते शित्तूरचंदगड ते दोडामार्गगगनबावडा ते करुळ घाटआजरा ते देव कांडगाव

राधानगरी तालुक्यात काल 63.4 मिमी पाऊसजिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात 63.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले- 3.4 मिमी, शिरोळ -1.3 मिमी, पन्हाळा- 28.7 मिमी, शाहूवाडी- 38.1 मिमी, राधानगरी- 63.4 मिमी, गगनबावडा- 55.4 मिमी, करवीर- 8.8 मिमी, कागल- 14.1 मिमी, गडहिंग्लज- 12.7 मिमी, भुदरगड- 32.4 मिमी, आजरा- 65 मिमी, चंदगड- 52.7 मिमी असा एकूण 26.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

राधानगरी धरणातून 4456 क्युसेक विसर्गराधानगरी धरणात 234.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज, सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3 व 6 खुले असून सध्या धरणातून 4456 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाराधानगरी 234.76 दलघमी, तुळशी 91.53 दलघमी, वारणा 883.92 दलघमी, दूधगंगा 610.34 दलघमी, कासारी 64.49 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.82 दलघमी, पाटगाव 94.61 दलघमी, चिकोत्रा 40.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

काल, बुधवारी राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे असे उघडत गेलेपहाटे 5.30 वाजता - गेट क्रमांक 6सकाळी 8.55 वाजता - गेट क्रमांक 5दुपारी 2.20 वाजता - गेट क्रमांक 3दुपारी 3.20 वाजता - गेट क्रमांक 4

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसKolhapur Floodकोल्हापूर पूरDamधरणWaterपाणी