Kolhapur: नेज येथील रिसॉर्टवरील डान्स पार्टीवर छापा, आठ महिलांसह २४ संशयितांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:32 IST2025-07-25T19:32:35+5:302025-07-25T19:32:35+5:30
कारवाईबाबत कमालाची गोपनीयता पाळण्यात आली होती

Kolhapur: नेज येथील रिसॉर्टवरील डान्स पार्टीवर छापा, आठ महिलांसह २४ संशयितांवर गुन्हा दाखल
हातकणंगले : नेज (ता. हातकणंगले) येथील रिसॉर्टवर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंकी यांनी छापा टाकून परवाना नसताना डॉन्स पार्टी करणाऱ्या आठ महिला आणि १६ पुरुष अशा २४ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई १६ जुलैच्या मध्यरात्री केली. परंतु, पोलिसांनी या कारवाईची माहिती गुरुवारी दिली.
या कारवाईबाबत कमालाची गोपनीयता पाळण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे यांनी दिली. पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना सोडून दिले.
फिर्यादीत म्हटले आहे की, कुंभोज येथील वॉटर फिल्टर हाऊसच्या पाठीमागे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये १६ जुलैच्या मध्यरात्री डान्सपार्टी सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंकी यांना मिळाली. त्यांनी फौजफाट्यासह रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टच्या हॉलमध्ये साऊंड सिस्टमच्या आवाजात डान्स करणाऱ्या आठ महिला आणि सोळा पुरुषांना त्यांनी ताब्यात घेतले. यातील पंधरा पुरुष कराड (जि. सातारा) तालुक्यातील आहेत. त्यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये अदिल लक्ष्मण कोळी (वय ४२, रा. मलकापूर, ता. कराड), लाडसाब सुलतान कोकणे (४२, रा. कराड), इम्तियाज मुबारक शेख (४२, रा. कडेगाव, जि. सांगली), रिसॉर्टमालक अभिजित नरसिंह शिंदे (३६, रा. इचलकरंजी), जगदीश कृष्णात पाटील (२४, रा. कोडोली, ता. पन्हाळा), अल्फाज कासीम शेख (२६, रा. मलकापूर, ता. कराड), समीर नुरमहंमद मोमीन (३१, रा. कराड), विजय बिरू पुजारी (२६, रा. मलकापूर, ता. कराड),
अकिब लियाकत पठाण (२६, रा. मलकापूर, ता. कराड), मजहर बदरुद्दीन पिरजादे (३५, रा. मलकापूर, ता. कराड), अक्षय संजय मोकाशी (३१, रा. कराड), वाहिद बाबासो मुल्ला (२७, रा. विंग, ता. कराड), प्रमोद तुकाराम जाधव (४१, रा. मार्केट यार्ड, कराड), कौस्तुभ शिवाजी यादव (२५, रा. विंग, ता. कराड), साहिल लियाकत मुल्ला (३०, रा. कार्वे नाका, कराड), अमिन रसुल शेख (२५, रा. मलकापूर, ता. कराड) यांच्यासह चोवीसजणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडण्यात आले.