शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगमुळे हळव्या मनावर ओरखडे

By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST

एन. जे. जमादार : शिवाजी विद्यापीठात कायदेविषयक कार्यशाळा

कोल्हापूर : रँगिंगमुळे केवळ शारीरिक इजा होते असे नाही, तर हळव्या मनावर कायमस्वरूपी ओरखडे उमटले जातात. कित्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. रॅगिंग विरोधी कायदा मंजूर होण्यामध्ये भारतीय न्याय पालिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शैक्षणिक संस्था यांची भूमिकाही महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी आज, मंगळवारी येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयातून विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक माहिती कायर्शाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात झालेल्या या कायर्शाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. यावेळी न्या. जमादार म्हणाले, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना प्रदान केलेला जगण्याचा अधिकार हा त्यांच्या सन्मानपूर्वक जगण्याची खात्री देतो. घटनादत्त अधिकारांचा उपभोग घेत असताना आपल्या कर्तव्यांचेही भान नागरिकांनी सदैव बाळगण्याची गरज आहे. ८६ व्या घटनादुरुस्तीने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला. त्यामुळे मोफत व सार्वत्रिक शिक्षण देण्यास सरकार बांधिल आहे. युवकांनी शिक्षणाच्या हक्क, कायदा याचे चळवळीत रूपांतर करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले की, शिक्षण ही केवळ पदवी संपादनाची नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासाची निरंतर प्रक्रिया आहे. आयुष्यात चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यांचा सारासार विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये विकसित करून घेतली पाहिजे. रॅगिंग हा प्रकारही असाच आहे. संबंधित विद्यार्थ्याला तत्काळ निलंबित करण्याचे किंवा कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने प्रदान केले असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान होऊ नये, याचा शिक्षक म्हणून आम्हाला विचार करावा लागतो. त्यासाठी प्रामुख्याने संबंधित विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि प्रबोधन करण्यावर आमचे प्राधान्य असते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कायर्शाळेत कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. पाटील यांनी ‘शिक्षणाचा अधिकार’ या विषयावर, तर जिल्हा न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी ‘रॅगिंग प्रतिबंधक कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव रा. दा. पाटील, जिल्हा सरकारी वकील डी. जे. मंगसुळे, विद्यापीठाच्या विधी अधिकारी अनुष्का कदम, पल्लवी कोरगावकर, आदी उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले, तर विद्यापीठाचे विधी सल्लागार संतोष शहा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. विवेक कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)