शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

आर. के.-फरास यांच्यात खडाजंगी

By admin | Updated: July 27, 2015 00:28 IST

राष्ट्रवादीची बैठक : आमचे फोटो झळकतात म्हणून पोटात का दुखते? : फरास

कोल्हापूर : काही नगरसेवक फोटो झळकण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात येतात. त्यांचे पक्षासाठी योगदान किती? हा संशोधनाचा विषय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. तर, आम्हाला जेवढे जमते, तेवढे काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे फोटो झळकतात म्हणून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचा नाईलाज असल्याचा पलटवार नगरसेवक आदिल फरास यांनी केला. शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात शनिवारी (दि. २५) झाली. यामध्ये पोवार व फरास यांच्यात चांगलीच शाब्दिक फटकेबाजी झाली. पक्षातील अंतर्गत कुरघोडीवर बोट ठेवत आर. के. पोवार म्हणाले, ठरावीक लोकांना सोबत घेऊन शहर राष्ट्रवादीचे काम सुरू असल्याचा आरोप आमच्यावर होतो; पण सर्वांना बरोबर घेऊन सामूहिक निर्णय घेतले. पक्षाने दिलेल्या गाडीत बसतील एवढ्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरलो, तरीही असे आरोप होत असतील तर मग काय रेल्वे घेऊन फिरायचे का? असा सवाल करीत, काही नगरसेवक फोटोसाठी पक्षाच्या कार्यालयात येतात. पक्षासाठी कोणी किती योगदान दिले हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही त्यांनी केली. याचे जोरदार खंडण करीत नगरसेवक आदिल फरास म्हणाले, मी मुश्रीफसाहेबांचा कार्यकर्ता आहे. २००३ पासून पक्षात प्रामाणिकपणे काम करीत पक्षवाढीचा प्रयत्न केला. आमच्या घराण्याला १९६२ पासूनचा राजकीय वारसा आहे. सर्वांत जास्त मताधिक्याने मी विजयी झालो. मला जेवढे जमेल तेवढे काम केले. तरीही वर्तमानपत्रांतील माझे फोटो पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल तर मला त्याचा विचार करण्याची गरज नाही. आगामी काळात आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराची कार्यकारिणी करताना नवीन-जुन्यांचा मेळ घाला, अशी सूचना करीत आघाडी सरकारने शहराच्या विकासासाठी दिलेला निधी जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार व आदिल फरास यांनी एकत्रित येऊन निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याचे आदेशही त्यांनी दिले.५जनसुराज्य सोबतचजनसुराज्य पक्ष हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. या मित्राला बरोबर घेऊन राष्ट्रवादी महापालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगत कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगिंतले.सेना-भाजपला शुभेच्छाशिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कोण रांगत निवडून आले, कोणाची ताकद किती आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे लढून ताकद अजमावावी. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत.