शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Pune-Bengaluru Highway: कोल्हापुरातील पंचगंगा पुलावरील पिलर उड्डाण पुलासाठी अखेर ठेकेदार निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:12 IST

पाच किलोमीटर लांबीचा पूल, तीन वर्षांत करण्याची मुदत : वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरीलकोल्हापूरजवळील पंचगंगा नदीदरम्यान सांगली फाटा ते उचगावपर्यंतच्या पिलरच्या उड्डाण पुलाचा ठेकेदार निश्चित झाला आहे. मात्र, यासोबत पाठवलेल्या बास्केट ब्रिजचा प्रस्ताव केंद्र सरकारने तूर्त तरी नामंजूर केल्याने याचा ठेकेदार निश्चित झालेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.सन २०१९ मध्ये महापुरामुळे महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आले होते. यामुळे महामार्ग बंद राहिला होता. महापुराच्या पाण्यामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, भराव्याच्या पुलामुळे महापुराची तीव्रता वाढणार आहे. यामुळे पिलरचा पूल व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा केला. महामार्ग प्राधिकरणाने पिलरचा पूल आणि कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रिजचा प्रस्ताव करून केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाची तांत्रिकसह विविध समित्यांनी छाननी केली. छाननीत बास्केट ब्रिजचा प्रस्ताव केंद्राने नामंजूर केला. परिणामी याचा ठेकेदार निश्चित झाला नाही. केवळ पिलर पुलाच्या १ हजार ३९ रुपयांच्या कामाचा ठेकेदार निश्चित झाला आहे. ठेकेदार कंपनीला ३६ महिन्यांत म्हणजे तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

पाच किलोमीटर लांबीचा पूलठेकेदार निश्चित झालेला पिलरचा पूल सांगली फाटा ते उचगावपर्यंत पाच किलोमीटरचा होणार आहे. पिलर असल्याने पुलाखालून पुराचे, महापुराचे पाणी वाहून जाणार आहे. पाण्याला अडथळा येणार नसल्याने महापुराची तीव्रताही कमी होणार आहे. वाहतुकीची कोंडीही टळणार आहे, असे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

सन २०२३ मध्ये भूमिपूजन..सांगली फाटा शिरोली येथे सन २०२३ मध्ये बास्केट ब्रिजच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. ब्रिजच्या कामासाठी ठेकेदारही निश्चित झाला होता. दरम्यान, भरावाऐवजी पिलरच्या पुलाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यामुळे बास्केट ब्रिज बारगळला. नवीन पिलरच्या पुलासोबत बास्केट ब्रिजचा नव्याने प्रस्तावही पाठवण्यात आला होता. मात्र, सध्या तरी केवळ पिलरच्या उड्डाण पुलाचाच ठेकेदार निश्चित झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune-Bengaluru Highway: Contractor Finalized for Kolhapur's Panchganga Bridge Pillar

Web Summary : Contractor confirmed for Pune-Bengaluru Highway's Panchganga bridge pillar in Kolhapur. The pillar bridge aims to mitigate flood impact. The basket bridge proposal was rejected. Work is expected to complete in three years.