Pune-Bengaluru Highway: कोल्हापुरातील पंचगंगा पुलावरील पिलर उड्डाण पुलासाठी अखेर ठेकेदार निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:12 IST2026-03-26T19:10:23+5:302026-03-26T19:12:13+5:30

पाच किलोमीटर लांबीचा पूल, तीन वर्षांत करण्याची मुदत : वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात

Pune Bengaluru Highway: Contractor finally selected for pillar flyover on Panchganga Bridge in Kolhapur | Pune-Bengaluru Highway: कोल्हापुरातील पंचगंगा पुलावरील पिलर उड्डाण पुलासाठी अखेर ठेकेदार निश्चित

संग्रहित छाया

कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरीलकोल्हापूरजवळील पंचगंगा नदीदरम्यान सांगली फाटा ते उचगावपर्यंतच्या पिलरच्या उड्डाण पुलाचा ठेकेदार निश्चित झाला आहे. मात्र, यासोबत पाठवलेल्या बास्केट ब्रिजचा प्रस्ताव केंद्र सरकारने तूर्त तरी नामंजूर केल्याने याचा ठेकेदार निश्चित झालेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

सन २०१९ मध्ये महापुरामुळे महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आले होते. यामुळे महामार्ग बंद राहिला होता. महापुराच्या पाण्यामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, भराव्याच्या पुलामुळे महापुराची तीव्रता वाढणार आहे. यामुळे पिलरचा पूल व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा केला. 

महामार्ग प्राधिकरणाने पिलरचा पूल आणि कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रिजचा प्रस्ताव करून केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाची तांत्रिकसह विविध समित्यांनी छाननी केली. छाननीत बास्केट ब्रिजचा प्रस्ताव केंद्राने नामंजूर केला. परिणामी याचा ठेकेदार निश्चित झाला नाही. केवळ पिलर पुलाच्या १ हजार ३९ रुपयांच्या कामाचा ठेकेदार निश्चित झाला आहे. ठेकेदार कंपनीला ३६ महिन्यांत म्हणजे तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

पाच किलोमीटर लांबीचा पूल

ठेकेदार निश्चित झालेला पिलरचा पूल सांगली फाटा ते उचगावपर्यंत पाच किलोमीटरचा होणार आहे. पिलर असल्याने पुलाखालून पुराचे, महापुराचे पाणी वाहून जाणार आहे. पाण्याला अडथळा येणार नसल्याने महापुराची तीव्रताही कमी होणार आहे. वाहतुकीची कोंडीही टळणार आहे, असे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

सन २०२३ मध्ये भूमिपूजन..

सांगली फाटा शिरोली येथे सन २०२३ मध्ये बास्केट ब्रिजच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. ब्रिजच्या कामासाठी ठेकेदारही निश्चित झाला होता. दरम्यान, भरावाऐवजी पिलरच्या पुलाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यामुळे बास्केट ब्रिज बारगळला. नवीन पिलरच्या पुलासोबत बास्केट ब्रिजचा नव्याने प्रस्तावही पाठवण्यात आला होता. मात्र, सध्या तरी केवळ पिलरच्या उड्डाण पुलाचाच ठेकेदार निश्चित झाला आहे.

Web Title : पुणे-बेंगलुरु हाईवे: कोल्हापुर के पंचगंगा पुल के खंभे के लिए ठेकेदार तय

Web Summary : पुणे-बेंगलुरु हाईवे पर कोल्हापुर के पंचगंगा पुल के खंभे के लिए ठेकेदार तय हो गया है। खंभा पुल का उद्देश्य बाढ़ के प्रभाव को कम करना है। बास्केट ब्रिज का प्रस्ताव खारिज कर दिया गया। काम तीन साल में पूरा होने की उम्मीद है।

Web Title : Pune-Bengaluru Highway: Contractor Finalized for Kolhapur's Panchganga Bridge Pillar

Web Summary : Contractor confirmed for Pune-Bengaluru Highway's Panchganga bridge pillar in Kolhapur. The pillar bridge aims to mitigate flood impact. The basket bridge proposal was rejected. Work is expected to complete in three years.