शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

जनता गाडीमुळे नाराजी

By admin | Updated: January 10, 2015 00:14 IST

दिंडनेर्ली परिसर : गाडी बंद होणार असल्याने प्रवासी हवालदिल दिंडनेर्ली परिसर : गाडी बंद होणार असल्याने प्रवासी हवालदिल

दिंडनेर्ली : गेली १२ वर्षांपासून वडाप पूर्ण बंद होऊन गावागावांतील प्रादेशिक घटकांशी एकजीव झालेली जनता गाडी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आदेशानंतर आता दिंडनेर्ली, नंदगाव, गिरगावकडे फिरकणारच नसल्याने ‘वाट पाहीन, पण एस.टी.नेच जाईन’ ही खूणगाठ मनाशी बाळगलेले विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी मात्र हवालदिल झाले आहेत. ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. शहरातील रिक्षा स्टॉपवरती एस.टी.चा थांबा असल्याने होणारा आर्थिक तोटा व महापालिका क्षेत्रात शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करण्याचा अधिकार फक्त केएमटीला असल्याचे कारण देत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश दिले आहेत, तर शहरात बस थांबे नसल्याने या मार्गावरील एस.टी. फेरी बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.त्यामुळे सकाळी सहापासून सायंकाळी दहापर्यंत प्रवाशांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेली एस.टी. बंद होणार असल्याने दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या निर्णयाने संतप्त झाले आहेत. १४ वर्षांपूर्वी केएमटी सेवा विस्कळीत झाल्याने वडाप जोरात सुरू झाले; पण बेभरवशाचे व धोकादायक वडाप वाहतुकीविरोधात आवाज देत विद्यार्थ्यांनी, प्रवाशांनी आंदोलन केल्याने जनता गाडी सुरू झाली होती. या एस.टी.बसच्या सेवेचा शेतकरी वर्गालाही मोठा फायदा झाला. शेतीमालाला गावालगतच कोल्हापूरची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना ५० टक्के सवलत व कामगार पासही सवलतीत मिळत असल्याने सर्वच घटक आनंदात होते. पण, आताच्या निर्णयानुसार केएमटी सुरू झाल्यास सवलती मिळण्यात मर्यादा आहेत.
या संतप्त प्रतिक्रियेचे रूपांतर आंदोलनात होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेहमीच चर्चेतील दक्षिण मतदारसंघातील गावांना एस.टी.ची सेवा मुकणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींपैकी कोण धावून येणार का, याची वाट प्रवाशांना पहावी लागणार आहे. (वार्ताहर)