शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीएम’ची दमदार सुरुवात

By admin | Updated: November 26, 2014 00:52 IST

केएसए लीग फुटबॉल : ‘फुलेवाडी’वर ३-२ने मात, ‘दिलबहार’ - ‘उत्तरेश्वर’ सामना बरोबरीत

कोल्हापूर : केएसए लीग फुटबॉल सामन्यात आज, मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडामंडळावर ३-२ अशा गोलफरकाने मात करीत दमदार सुरुवात केली; तर अन्य एका सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यामध्ये झालेला सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. छत्रपती शाहू स्टेडियमवर यंदाच्या फुटबॉल हंगमातील आज पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये सामना होता. दोन्ही संघ तगडे असल्याने सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभास दोन्ही संघांनी बचावात्मक खेळी करीत एकमेकांचा अंदाज घेत खेळण्यास सुरुवात केली. काही मिनिटांनी ‘फुलेवाडी’ने शॉर्ट पासवर भर देत खोलवर चढाया केल्या. यामध्ये ‘फुलेवाडी’ संघाच्या अजित पोवारच्या पासवर राजा दासने गोल करीत सामन्यात आघाडी घेतली. या गोलनंतर पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने आक्रमण खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये हृषीकेश मेथे-पाटीलने १६ व्या मिनिटाला गोल करीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. दोन्ही संघांनी आघाडी भक्कम करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ४०व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’च्या हृषीकेश मेथे-पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल नोंदवीत सामन्यात एक गोलची आघाडी घेतली. ही आघाडी अल्पकाळच टिकली. ‘फुलेवाडी’ संघाच्या राजा दासनेही वैयक्तिक दुसरा व संघाचाही दुसरा गोल करीत मध्यंतरापर्यंत सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. उत्तरार्धात ‘फुलेवाडी’ने थोडी आक्रमक खेळी केली. मात्र, पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने आक्रमकच पवित्रा घेत खेळी करण्यास सुरुवात केली. ७३ व्या मिनिटाला ओमकार जाधवच्या पासवर नियाज पटेलने गोल करीत सामन्यात ३-२ अशी आघाडी घेतली. ती कायम ठेवण्यास पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाला शेवटच्या मिनिटापर्यंत यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)‘दिलबहार’-‘उत्तरेश्वर’चा तोडीस तोड खेळपहिल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना २-२ अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना खाते उघडता न आल्याने सामना गोलशून्य फरकाने बरोबरीत होता.उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. दिलबहार तालीम मंडळाच्या आदित्य मानेने ५३ व्या मिनिटाला गोल करीत संघाचे गोलचे खाते उघडले. ही आघाडी ६० व्या मिनिटाला उत्तरेश्वर संघाच्या ओंकार लोकरेने कमी केली. ७७ व्या मिनिटाला आदित्य माने याने गोल करीत सामन्यात २-१ ने आघाडी घेतली. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ‘उत्तरेश्वर’ संघाच्या रोहन डकरेने गोल नोंदवीत सामन्यात २-२ अशा गोलफरकाने बरोबरी केली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यात ‘फुलेवाडी’च्या खेळाडूंनी मारलेला चेंडू गोल पोस्टच्या बाहेर ढकलताना ‘पाटाकडील’चा गोलरक्षक शैलेश पाटील.