सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उद्या निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:17+5:302021-01-20T04:25:17+5:30

सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उद्या निदर्शने कोल्हापूर : दिल्लीतील आंदाेलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने उद्या ...

Protests by government employees' union tomorrow | सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उद्या निदर्शने

सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उद्या निदर्शने

सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उद्या निदर्शने

कोल्हापूर : दिल्लीतील आंदाेलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने उद्या गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

--

नेत्रतपासणी केंद्राचे आज उद्घाटन

कोल्हापूर : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) तर्फे शाहुपुरी तिसरी गल्ली येथे नेत्रतपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राचे उद्घाटन बुधवारी (दि.२०) दुपारी १२ वाजता ऑपथॉल्मॅजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अभिजित तगारे यांच्या हस्ते होणार आहे. तरी नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

नाट्य परिषदेतर्फे रविवारी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिनिमित्त रविवारी (दि.२४) ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाच्या मोफत प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.

केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता होणाऱ्या या प्रयोगास पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने कोल्हापुरातील नाट्य व्यावसायिकांसाठी केशवराव भोसले नाट्यगृह पून्हा सुुरू होत आहे. विनामूल्य प्रवेशिका शुक्रवारपासून नाट्यगृहावर सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ८ यावेळेत उपलब्ध होतील तरी रसिकांनी नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे.

१९०१२०२१-संदीप पाठक-अभिनेता

---

Web Title: Protests by government employees' union tomorrow