शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जायबंदी संरक्षित समुद्री कासवाला कोल्हापुरात बसविले कृत्रिम पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:09 IST

कोकणात मच्छिमारांच्या जाळ्यांमुळे अपंग झालेल्या संरक्षित समुद्री ऑलिव्ह रिडले कासवाला कृत्रिमरित्या पाय बसविण्याचा देशातील पहिलाच प्रयोग कोल्हापुरात यशस्वी झाला आहे. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर आणि त्यांच्या मदतनिसांनी अथक प्रयत्न करून या कासवाला जीवदान दिले. टर्टल सर्व्हायवल अलायन्स संस्थेचे संचालक शैलेंद्र सिंग यांनी देशात प्रथमच हा प्रयोग झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

ठळक मुद्देजायबंदी संरक्षित समुद्री कासवाला कोल्हापुरात बसविले कृत्रिम पायडॉ. संतोष वाळवेकर यांच्यामुळे जीवदान : देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी

संदीप आडनाईक कोल्हापूर : कोकणात मच्छिमारांच्या जाळ्यांमुळे अपंग झालेल्या संरक्षित समुद्री ऑलिव्ह रिडले कासवाला कृत्रिमरित्या पाय बसविण्याचा देशातील पहिलाच प्रयोग कोल्हापुरात यशस्वी झाला आहे. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर आणि त्यांच्या मदतनिसांनी अथक प्रयत्न करून या कासवाला जीवदान दिले. टर्टल सर्व्हायवल अलायन्स संस्थेचे संचालक शैलेंद्र सिंग यांनी देशात प्रथमच हा प्रयोग झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.शेड्यूल्ड वनमध्ये समाविष्ट असलेले हे कासव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जायबंदी अवस्थेत वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्यावर सोमनाथ वेंगुर्लेकर यांना माशाच्या जाळ्यात अडकलेले दिसले. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू, सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी कासवाला बाहेर काढून कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

या कासवाचा पुढचा डावा पाय जाळ्यात अडकून पूर्णपणे तुटला होता तर मागील उजवा पाय तुटून पडण्याच्या मार्गावर होता. महिनाभर गाळात अडकल्याने कासवाची प्रकृती गंभीर होती. कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तत्काळ सावंतवाडी उपवन संरक्षक एस. डी. नारणवर यांच्या सूचनेनुसार त्याला कोल्हापूरच्यावन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राकडे पुढील उपचारासाठी दाखल केले.कोल्हापूर वनवृत्ताचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी २५ दिवस उपचार व संगोपन करून कासवाचा जीव वाचविला. कासवाची प्रकृती स्थिरावली, परंतु दोन्ही पाय निकामी झाल्याने हे कासव पाण्यात पोहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या कासवाला कृत्रिम पाय बसविण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी (दि. २७) यशस्वी शस्त्रक्रिया केली.तयार केला कृत्रिम पायकासवासाठी कृत्रिम पाय तयार करण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे कलाकार चंद्रकांत हल्याळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी १० दिवसात कासवाच्या उजव्या पायाच्या आकारमानानुसार डाव्या पायाची क्लेपासूनची प्रतिकृती बनविली. स्माईल डेंटल लॅबचे कृष्णात पोवार यांनी डेंटल इम्प्रेशनमध्ये पायाचा तसेच सांध्याचा साचा तयार केला. प्रदीप कुंभार यांच्या मदतीने महत्‌प्रयासाने मिळविलेल्या सिलीकॉनचा वापर करून पहिल्याच प्रयत्नात कृत्रिम पाय तयार केला.यशस्वी शस्त्रक्रियातासभर चाललेल्या या शस्त्रक्रियेसाठी आणि संगोपनासाठी प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी व केअर टेकर अमित कुंभार, वंशिका कांबळे, सानिका सावंत, हृषीकेश मेस्त्री, आकाश भोई, यश खबाले, अवधूत कुलकर्णी, प्रदीप सुतार यांनी मदत केली. पाय बसताच दीड महिना जागेवरच अडकलेल्या या कासवाने तत्काळ कृत्रिमरित्या तयार केलेल्या पाण्यात हालचाल सुरू केली.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागdoctorडॉक्टरkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण