शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पालिका हस्तक्षेपाविना घनकचरा प्रकल्प

By admin | Updated: May 29, 2015 00:03 IST

समितीची बैठक : पालिका कार्यपद्धतीची माहिती घेतली; चांगल्या प्रकल्पाची ग्वाही

सांगली : हरित न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचराप्रश्नी गठित झालेल्या तीनसदस्यीय समितीने गुरुवारी महापालिकेकडून कचरा उठाव, स्वच्छता, विल्हेवाटीची कार्यपद्धती याबाबतची माहिती घेतली. महापालिकेला घनकचऱ्याचा चांगला प्रकल्प देऊ, अशी ग्वाही समितीने दिल्याची माहिती आयुक्त अजिज कारचे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय हा प्रकल्प होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हरित न्यायालयाने घनकचरा प्रकल्पाचा अहवाल, तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी, त्यासाठीचा कालावधी निश्चित करणे, या बाबीसाठी मुंबईच्या आयआयटी, पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट व सांगलीतील वालचंद महाविद्यालय या तीन संस्थांची समिती नियुक्त केली आहे.गुरुवारी आयआयटीचे प्रा. अनिल दीक्षित, गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रीती मस्तकर, डॉ. मस्तकर व ‘वालचंद’चे प्रा. प्रताप सोनावणे यांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी बेडग व समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोची पाहणी केली.बैठकीत महापालिकेने हरित न्यायालयाचे तीन आदेश, कोल्हापूरचा डीपीआर, महापालिकेने एसीसी सिमेंट कंपनीचा कचराप्रश्नी आलेला प्रस्ताव याची माहिती दिली. शहरातील दररोजचा कचरा, सध्याची विल्हेवाटीची कार्यपद्धती व प्रस्तावित कार्यपद्धती यावर चर्चा झाली.बैठकीची माहिती देताना महापालिका आयुक्त अजिज कारचे म्हणाले की, या तीन संस्थांकडे जागतिक दर्जाचा अनुभव आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार एक महिन्यात प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे. तशी माहिती समिती सदस्यांना दिली आहे. महापालिकेच्या हस्तक्षेपाशिवाय हा प्रकल्प होणार असल्याने तो निश्चित लाभदायक होईल, अशी प्रशासनाची आशा आहे. समितीकडून थेट न्यायालयात अहवाल सादर होणार की महापालिकेकडे, याविषयी आताच सांगणे कठीण आहे. पण समितीने चांगला प्रकल्प देऊ, अशी ग्वाही दिली आहे. महापालिकेच्या नगरसेवकांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर माहिती देणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)पदाधिकाऱ्यांची दांडीहरित न्यायालयाच्या दणक्यानंतरही पालिकेतील पदाधिकारी निर्धास्त आहेत. समितीच्या बैठकीसाठी प्रशासनाने सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते. पण उपमहापौर प्रशांत पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज वगळता महापौर, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी गटाचे नेते हे तीनही पदाधिकारी बैठकीला गैरहजर होते. तसेच बैठकीतील संभाषण इंग्रजीतून असल्याने अनेक सदस्यांनी काढता पाय घेतला होता. ४हरित न्यायालयातील याचिकाकर्ते घनकचरा प्रकल्प समितीत प्रतिनिधी म्हणून दोन नावांची शिफारस केली आहे. होमी भाभा रिसर्च इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. शरद काळे व ज्येष्ठ कार्यकर्त्या ज्योती म्हापसेकर यांचा समितीत समावेश करावा, असे निवेदन आयुक्त कारचे यांना दिले आहे.