सामाजिक चळवळींतून वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती

By Admin | Updated: December 30, 2016 00:09 IST2016-12-30T00:09:13+5:302016-12-30T00:09:13+5:30

अरुणा ढेरे : शिवाजी विद्यापीठात ‘स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन चळवळी आणि स्त्रियांचे प्रश्न’ विषयावर चर्चासत्र

Production of Literary Rebellion from Social Movements | सामाजिक चळवळींतून वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती

सामाजिक चळवळींतून वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती

कोल्हापूर : सामाजिक चळवळींतूनच वाङ्मयीन विद्रोहाची निर्मिती झाली आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाच्या सदस्या डॉ. अरुणा ढेरे यांनी बुधवारी व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग व साहित्य अकादमीतर्फे आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. वि. स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हे चर्चासत्र झाले. ‘स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन चळवळी आणि स्त्रियांचे प्रश्न’ असा चर्चासत्राचा विषय होता. डॉ. ढेरे म्हणाल्या, निषेधाच्या आणि परिवर्तनवादी, मानवतावादी चळवळींतून मराठी साहित्यपरंपरा आविष्कृत होत आली आहे. धर्मसुधारणा, महिलांचे प्रश्न ते स्त्री शोषणाच्या अस्मितेचे कंगोरे मराठीतील लेखिकांनी वेळोवेळी प्रकट केले आहेत. चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. पी. ए. अत्तार यांच्या हस्ते झाले. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव डॉ. कृष्णा किंबहुने यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)

विविध विषयांवर निबंध वाचन
चर्चासत्रातील दुपारच्या विविध सत्रांमध्ये डॉ. दिलीप चव्हाण, शरयू असोलकर, सोनाली नवांगुळ, पी. विठ्ठल, मेघा पानसरे, प्रभाकर देसाई यांनी स्त्री साहित्यासंबंधीच्या विविध विषयांवर निबंध वाचन केले. डॉ. रोहिणी तुकदेव आणि शोभा नाईक यांनी या सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. नंदकुमार मोरे, नीला जोशी व सुश्मिता खुटाळे यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Production of Literary Rebellion from Social Movements