शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या झोपडपट्टीमुळे समस्या कायम

By admin | Updated: January 21, 2015 23:58 IST

सांडपाण्याचे तीनतेरा : कमी दाबाने पाण्याचा प्रश्न, सांस्कृतिक हॉल, शौचालयांचे काम प्रलंबित

कोल्हापूर : राजेंद्रनगर प्रभाग म्हणजे शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेला प्रभाग. याठिकाणी उच्च, मध्यमवर्गीयांची वस्ती देखील वाढत आहे. पाणीपुरवठा, प्रमुख रस्त्यांची झालेली चाळण या प्रमुख समस्या सोडविण्यासाठी नगरसेविका जयश्री साबळे या यशस्वी झाल्या आहेत. मात्र, झोपडपट्टीमधील वाढत्या वस्त्यांमुळे येथील समस्या सोडविताना त्या अपयशी झाल्या आहेत, असे चित्र प्रभागात पाहण्यास मिळते. राजेंद्रनगर प्रभागात शाहू पार्क, रेव्हेन्यू कॉलनी, विजयश्री पार्क, महालक्ष्मी पार्क, डी. आर. भोसलेनगर, चिले महाराज हौसिंग सोसायटीसह राजेंद्रनगर झोपडपट्टी हे प्रमुख प्रभाग येतात. प्रभागातील प्रमुख समस्यांपैकी मोरेवाडी जकात नाका ते एस. सी. सी बोर्ड हा रस्ता अत्यंत खराब रस्ता होता. या प्रभागात खराब रस्ते असल्याने नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत होता. जयश्री साबळे यांनी पाठपुरावा करून या प्रभागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांची कामे केली आहेत. या प्रभागातील दुसरी समस्या होती, ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची होय. चार दिवसांतून एकदा या प्रभागात पाणी येत होते. त्यामुळे महिलावर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, साबळे यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून प्रभागात एक कोटी ६० लाख रुपयांची मुख्य पाईपलाईन टाकल्याने येथील पाण्याची समस्या सुटली आहे. राजेंद्रनगर झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते झाले आहेत. तसेच झोपडपट्टीत २८० मोठे मर्क्युरी बल्बही बसविले आहेत. त्यामुळे लाईटची समस्या दूर झाली. मात्र, येथील सार्वजनिक शौचालय, अंतर्गत गटारींची स्वच्छता याचे तीनतेरा वाजले आहेत. यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच काही नागरिकांनी या ठिकाणी पाणी येत नसल्याने चार ते पाच फूट खोल खड्डे खणले आहेत. त्यामधून पाणी घेतात. मात्र, या खड्ड्यात पडून अनेकांना इजा झाल्या आहेत. नगरसेविका झोपडपट्टीमधील ठरावीक गल्लीतच विशेष लक्ष देऊन सुविधा पुरवितात. मात्र, काही गल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षित करीत आहेत, असे येथील नागरिक सांगतात. प्रभागात ७०० घरगुती शौचालये मंजूर केली आहेत, तर राजेंद्रनगर येथे ४५ लाखांचा सांस्कृतिक हॉल उभारण्यात आला आहे. मात्र, ही कामे अजूनही प्रलंबित आहेत.प्रदीप शिंदेप्रभाग क्र. ७७ (राजेंद्रनगर)प्रभागात प्रामुख्याने पाणी व रस्ते या प्रमुख समस्या होत्या. त्या मार्गी लागल्या आहेत. प्रभागातून चार बागा उभारण्याचा मानस आहे. तसेच राजेंद्रनगर येथील प्रॉपर्टी कार्ड वाटप लवकरच करण्यात येणार आहे. राजेंद्रनगर येथे काही समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. - जयश्री साबळे, नगरसेविका