शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रायव्हेट क्लासेस आजपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रायव्हेट क्लासेस आज, शुक्रवारपासून पूर्ववत सुरू होणार ...

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रायव्हेट क्लासेस आज, शुक्रवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. या परवानगीनुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. त्यामुळे क्लासेस चालक आणि तेथील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

हॉटेल, सर्व दुकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करत सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिली. या धर्तीवर प्रायव्हेट क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यासाठी जुलैपासून कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनचा (केप्टा) पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा प्रशासनाला असोसिएशनने निवेदने दिली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने दि. ३० ऑगस्ट रोजी प्रायव्हेट क्लासेसमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग शासनाच्या नियम आणि अटीनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे एक हजार क्लासेसमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. परवानगी मिळविण्याबाबत पालकमंत्री पाटील, जिल्हा प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले, असे ‘केप्टा’चे उपाध्यक्ष प्रा. अतुल निंगुरे यांनी गुरुवारी सांगितले.

चौकट

एका बेंचवर एक विद्यार्थी

क्लासेसच्या वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक असणार आहे. क्लासमधील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, आदी कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येऊ नये, अशा सूचना शासनाने केल्या आहेत.