शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

जांभळासारख्या दिसणाऱ्या जम्बो द्राक्षांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:58 PM

Fruits Grapes Kolhapur- जांभळासारखाच गडद रंग, आकारही अगदा सेम टू सेम अशा जम्बो द्राक्षांनी कोल्हापुरात पहिल्यांदाच भरवलेल्या द्राक्ष महोत्सवात चांगलाच भाव खाल्ला.  या पाचदिवसीय महोत्सवात दिवसभर चोखंदळ रसिक ग्राहकांची अक्षरश: रीघ लावत नवनवीन द्राक्षांची चव चाखत खरेदीही केली.

ठळक मुद्देजांभळासारख्या दिसणाऱ्या जम्बो द्राक्षांनी खाल्ला भाव कोल्हापुरात द्राक्ष महोत्सव, चोखंदळ रसिक ग्राहकांची रीघ लावत खरेदी

कोल्हापूर : जांभळासारखाच गडद रंग, आकारही अगदा सेम टू सेम अशा जम्बो द्राक्षांनी कोल्हापुरात पहिल्यांदाच भरवलेल्या द्राक्ष महोत्सवात चांगलाच भाव खाल्ला.  या पाचदिवसीय महोत्सवात दिवसभर चोखंदळ रसिक ग्राहकांची अक्षरश: रीघ लावत नवनवीन द्राक्षांची चव चाखत खरेदीही केली.उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने गोव्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात द्राक्ष महोत्सव भरविला आहे. शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मंगळवार ३० पर्यंत खरेदी करता येणार आहे.

महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन झाले.

नवनवीन द्राक्षांच्या जाती महोत्सवात गोड चवीचे अनुष्का, जांभळासारखे दिसणारे जंबो सिडलेस, रेडग्लोब, लांबसडक बोटासारखे दिसणारे सुपर सोनाक्का, जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचे माणिकचमण, बियांशिवाय मऊ लुसलुशीत खाता येणारी म्हणून कृष्णा सिडलेस, आर.के. सुपर, शरद सीडलेस, आदी जातींची द्राक्षे महोत्सवाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी पाहायला, चाखायला मिळत आहेत.

बाजारापेक्षा दर जास्त, ग्राहक नाराज

बाजारापेक्षा दर जास्त असल्याबद्दल भेट देणारे ग्राहक काहीशी नाराजी व्यक्त करताना दिसत होते. याबद्दल विक्रेते असलेल्या शेतकऱ्यांकडे याबाबत तक्रारही मांडत होते, यावर निर्यातीच्या गुणवत्तेची द्राक्षे असल्याने दर काहीसा जास्त असल्याचे स्पष्टीकरण दिले जात होते. 

टॅग्स :fruitsफळेkolhapurकोल्हापूर