शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जुलैला कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 12:17 IST

कोल्हापूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ...

कोल्हापूर : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटनासाठी १९६२ ला कोल्हापुरात आले होते. बालकल्याण संकुलाच्या इमारतीचे उदघाटन त्यावेळी त्यांच्या हस्ते झाले होते. त्यापूर्वी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या विनंतीवरून त्यांनी उपराष्ट्रपती असताना भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलला १९५५च्या सुमारास भेट दिली होती. त्यानंतर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुलकलाम आणि प्रतिभाताई पाटील यादेखील कोल्हापूरला आल्या होत्या. कलाम यांनी वारणेलाही भेट दिली होती. त्यानंतर प्रथमच दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपती कोल्हापुरात येत असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतील त्यानंतर वारणेला विविध कार्यक्रमासाठी जातील. तिथे नेमका काय कार्यक्रम आहे हे गोपनीय ठेवले आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेत त्या कोल्हापुरात आहेत. त्यांचे आगमन, स्वागत, सुरक्षा यासह संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनावर शुक्रवारच्या बैठकीत चर्चा झाली व प्रत्येकाकडे जबाबदारी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन त्यांना दौऱ्याच्या नियोजनाच्या तयारीबाबत सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPresidentराष्ट्राध्यक्ष