शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

महापुराच्या नुकसानीचे जागतिक बँकेसमोर सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:37 PM

महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्याचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतर या बँकांकडून अर्थसाहाय्याची मागणी करण्यात येणार असल्याने याबाबतचे सादरीकरण अचूक असावे, अशा सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि या महापुराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास नेमणूक केलेले प्रवीण परदेशी यांनी कोल्हापुरात दिल्या.

ठळक मुद्देमहापुराच्या नुकसानीचे जागतिक बँकेसमोर सादरीकरणप्रवीण परदेशी यांची माहिती, अधिकाऱ्यासोबत घेतला आढावा

कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्याचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतर या बँकांकडून अर्थसाहाय्याची मागणी करण्यात येणार असल्याने याबाबतचे सादरीकरण अचूक असावे, अशा सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि या महापुराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास नेमणूक केलेले प्रवीण परदेशी यांनी कोल्हापुरात दिल्या.जिल्ह्यातील पुरानंतरच्या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी सकाळी परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी प्रामुख्याने त्यांनी याआधीच्या बैठकीत वेगवेगळ्या विभागांना विशिष्ट कामे दिली होती, त्याचा त्यांनी आढावा घेतला. प्रामुख्याने त्यांनी यावेळी पिण्याचे पाणी, स्वच्छताविषयक कामांबाबत चर्चा केली.सार्वजनिक बांधकाम, महसूल, पाणीपुरवठा, आरोग्य, कृषी या सर्व विभागांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील या नुकसानीचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करावयाचे असल्याने त्यामध्ये अचूकता असावी, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे सादरीकरण केले. त्यामध्ये परदेशी यांनी काही बदल सुचविले. बैठकीनंतर त्यांनी ‘सीएम फेलो’ म्हणून कार्यरत असणाऱ्या युवक युवतींशीही चर्चा केली.यानंतर त्यांनी शिरोळ तालुक्यात मदतकार्याला भेट देऊन नंतर ते सांगलीला गेले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर